राज्यात वांगी प्रतिक्विंटल ३०० ते ३५०० रुपये

brinjal
brinjal

पुण्यात दहा किलोला २०० ते २५० रुपये दर 
पुणे  -  गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १३) विविध प्रकारच्या वांग्याची सुमारे १० टेम्पो आवक झाली होती. या वेळी दहा किलोला २०० ते २५० रुपये दर मिळाला होता. वांग्याची आवक ही प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. अशी माहिती अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली.  विविध प्रकारच्या वांग्यांच्या आवकेमध्ये भरताची मोठी वांगी, जांभळी वांगी आणि लहान गावरान वांग्याचा समावेश आहे. सध्या आवक आणि दर हे संतुलित असल्याचेही भुजबळ यांनी या वेळी सांगितले. गेल्या चार दिवसांत सरासरी दर हे १०० ते ३०० रुपये होते.
-------------------------------------
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल १३०० ते ३५०० रुपये 
नाशिक  -
 येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवार (ता. १२) रोजी वांग्याची आवक १७३ क्विंटल झाली होती. त्यास प्रतिक्विंटल १३०० ते ३५०० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २६०० रुपये होते. अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ११) रोजी वांग्याची आवक १७२ क्विंटल झाली. त्यास १४०० ते ४००० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० रुपये होता. सोमवार (दि. १०) रोजी वांग्याची आवक २७४ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ४००० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३००० होता. शनिवार (ता. ८) रोजी वांग्याची आवक १४७ क्विंटल झाली. त्यास १५०० ते ३२०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २२५० होता. शुक्रवार (ता. ७) रोजी वांग्याची आवक १६९ क्विंटल झाली. त्यास १२०० ते ३००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० होता. गुरुवार (ता. ६) रोजी वांग्याची आवक १६६ क्विंटल झाली. त्यास ७५० ते ३००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २६०० होता. मागील आठवड्यापासून बाजार समितीत वांग्याची आवक सर्वसाधारण होती. मागील काही दिवसांत आवक वाढली असून दरातही वाढ दिसून आली. 

-------------------------------------
अकोल्यात  वांगी ६०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल 
अकोला  -
 येथील जनता भाजी बाजारात वांग्यांना चांगली प्रतिक्विंटल ६०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. येथील बाजारात वांग्यांची आवक रोज २५ ते ३० क्विंटलपर्यंत होत आहे. गेल्या काही दिवसांत वांग्यांचे दर कमी झाले आहे. गुरुवारी दुय्यम प्रतीचे (जाड झालेले वांगे) ६०० ते ९०० रुपयांदरम्यान प्रतिक्विंटल विक्री झाले. तर चांगल्या प्रतीचे वांगे १००० ते १५०० दरम्यान विक्री झाले. उन्हाळ्यात लग्नसराईचा ग्रामीण भागात धडाका सुरू होताच वांग्यांना अधिक मागणी होत असते. यासाठी अद्याप काही दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे. त्यानंतर मागणीत वाढ होऊन दर सुधारण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. किरकोळ बाजारात वांगी २० ते ३० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात होती. 
-------------------------------------
सांगलीत दहा किलोस १५० ते २०० रुपये दर 
सांगली  - येथील शिवाजी मंडई गुरुवारी (ता. १३) वांग्याची १३० बॉक्सची (एक बॉक्स २० किलोचे) झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंडईत सांगली जिल्ह्यातील वाळवा, आष्टा, तुंग, कवठेपिरान, दूधगाव, विटा यांसह शेजारील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातून वांग्याची आवक आहे. बुधवारी (ता. १२) वांग्याची १२० बॉक्सची आवक झाली असून, त्यास प्रति दहा किलोस १५० ते २०० रुपये असा दर मिळाला. पुढील सप्ताहात वांग्याची आवक आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.

-------------------------------------
सोलापुरात वांग्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये 
सोलापूर -
 सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची आवक चांगली होती. तसाच त्याला उठावही तसाच मिळाला. वांग्याला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ३००० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात वांग्याची रोज २० ते ५० क्विंटलपर्यंत आवक होती. वांग्याची आवक स्थानिक भागातून जास्त होती. बाहेरील आवक कमी होती. गेल्या काही दिवसांपासून वांग्याला चांगला उठाव मिळतो आहे. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या आठवड्यातही वांग्याची आवक तशी जेमतेम १० ते २० क्विंटल प्रतिदिन होती. पण दरही जैसे थे होते. प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपये असा दर मिळाला. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यातही दर आणि आवकेची परिस्थिती काहीशी अशीच होती. आवक ४० ते ६० क्विंटलपर्यंत राहिली. तर दर प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक ३००० रुपये दर होता. २०० ते ३०० रुपयांच्या फरकाने चढ-उतार वगळता दर टिकून होते.

-------------------------------------
औरंगाबादेत वांगी ३०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटल
औरंगाबाद  - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१३) वांग्याची ४० क्‍विंटल आवक झाली. या वांग्याला ३०० ते ८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये ४ फेब्रुवारीला ४९ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ६०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ५ फेब्रुवारीला ४८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ६०० ते १३०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ६ फेब्रुवारीला ५८ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८ फेब्रुवारीला ३७ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ४०० ते ७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १० फेब्रुवारीला वांग्याची आवक ४३ क्‍विंटल तर दर ४०० ते ६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ११ फेब्रुवारीला ४३ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याला ५०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

-------------------------------------
नगरला वांगी ५०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल 
नगर -  नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत वांग्याला चांगली मागणी आहे. गुरुवारी (ता. १३) ४० क्विटंल वांग्याची आवक होऊन प्रती क्विंटल ५०० ते १६०० व सरासरी १०५० रुपयांचा दर मिळाला. नगर बाजार समितीत दर दिवसाला साधारण २५ ते ६० क्विटंलपर्यंत वांग्याची आवक होत असते. गेल्या महिनाभराच्या तुलनेत दरात सतत चढउतार होत आहे. ६ फेब्रुवारी रोजी २३ क्विंटलची आवक होऊन १००० ते २००० व सरासरी १५०० रुपयाचा दर मिळला. ३० जानेवारी रोजी ४० क्विंलटची आवक होऊन ५०० ते २००० व सरासरी १२५० रुपयाचा दर मिळाला. २३ जानेवारी रोजी ३५ क्विंटलची आवक होऊन १००० ते २००० व सरासरी १५०० रुपयाचा दर मिळाला. १६ जानेवारी रोजी ३६ क्विंटलची आवक होऊन १००० ते २५०० व सरासरी १७५० रुपयाचा दर मिळाला तर ९ जानेवारी रोजी ४५ क्विंटलची आवक होऊन ६०० ते १६०० सरासरी ११०० रुपयाचा दर मिळाला असे बाजार समितीतून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com