कोल्हापुरात टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते १३०० रुपये

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 एप्रिल 2019

कोल्हापूर - येथील बाजार समितीत मंगळवारी टोमॅटोची बाराशे कॅरेट आवक आवक झाली. टोमॅटोस दहा किलोस ५० ते १३० रुपये इतका दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

घेवड्याची २० पाट्या आवक झाली. घेवड्यास दहा किलोस ४०० ते ४५० रुपये इतका दर होता. गवारीस दहा किलोस २०० ते ४०० रुपये दर मिळाला. गवारीची ४५ पोती आवक झाली होती. ओला वाटाण्याची ४० पोती आवक झाली. वाटाण्यास ४०० ते ६०० रुपये इतका दर मिळाला. कारल्याची ४६ पाट्या आवक झाली होती. कारल्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर होता.

भेंडीच्या आवकेत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे. भेंडीची १५० करंडी आवक झाली. भेंडीस दहा किलोस १०० ते ४२० रुपये इतका दर मिळाला. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर व परिसरातून काकडीची आवक वाढत आहे. काकडीस दहा किलोस ३० ते १२० रुपये दर मिळाला. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची २६ हजार पेंढ्या आवक झाली. कोथिंबिरीस शेकडा ४०० ते ८०० रुपये इतका दर मिळाला. गेल्या आठवड्याच्या तुलनेत दर १० ते १५ टक्‍क्‍यांनी वाढल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. मेथीची सहा हजार पेंढ्या आवक होती. मेथीस शेकडा तीनशे ते एक हजार रुपये इतका दर होता.

फळांमध्ये हापूस आंब्याची १६० पेट्या आवक झाली. चार डझनच्या पेटीस ४५०० ते २५०० रुपये दर होता. गेल्या काही दिवसांपासून आंब्याची आवक सुरू झाली असली तरी अद्याप म्हणावी त्या प्रमाणात आंब्याची आवक नसल्याने आंब्याचे दर तेजीत स्थिर राहत असल्याचे फळ विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 500 to 1300 rupees per kilogram of tomato per quintal in Kolhapur