आपत्कालीन परिस्थितीसाठी पीक सल्ला 

आपत्कालीन परिस्थितीसाठी पीक सल्ला 

या वर्षी पावसाचे आगमन वेळेवर होऊन, जून महिन्यामध्ये चांगला पाऊस झाला असला तरी पुढे पावसामध्ये घट झाली. विशेषतः जुलै महिन्यामध्ये पाऊस अतिशय कमी झाला. ऑगस्ट महिन्यामध्येही आत्तापर्यंत समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने पीक परिस्थिती बिकट झाली आहे. पिकास पाण्याचा ताण पडत आहे. त्यातच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार १५ ऑगस्टपर्यंत पावसाची शक्यता नाही. अशा आपत्कालीन स्थितीमध्ये खालील उपाययोजना उपयुक्त ठरू शकतील. 
 

कापूस
कापूस पिकामध्ये हलकी कोळपणी किंवा वखरणी करावी. त्यामुळे जमिनीवर पडलेल्या भेगा बुजल्या जातात. त्यावर मातीचा थर तयार झाल्याने त्यातून होणारे बाष्पीभवन रोखले जाते. जमिनीच्या खालील थरातील ओलावा टिकून राहतो.
शक्य असल्यास संरक्षित पाणी द्यावे. पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी तुषार सिंचन पद्धती फायदेशीर ठरू शकते. 
पोटॅशियम नायट्रेट २० ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. तसेच अन्नद्रव्य उपलब्ध होते 

पीक संरक्षण (फवारणी प्रतिलिटर पाणी)
मावा किडीचा प्रादुर्भाव असल्यास, अॅसिटामाप्रिड ०.४ ग्रॅम किंवा डायमेथोएट २ मिली 
पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी, क्विनॉलफॉस २ मिली 

सोयाबीन 
सोयाबीन पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे 
तुषार सिंचनाद्वारे उपलब्ध पाणी संरक्षित सिंचन द्यावे 
पिकांना पाण्याचा ताण सहन करणे शक्य व्हावे, यासाठी पोटॅशियम नायट्रेट २० ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तसेच पिकास अन्नद्रव्याचा पुरवठा होतो 
उशिरा जुलैमध्ये पेरणी झालेल्या पिकांमध्ये वारंवार कोळपणी करावी. परिणामी जमिनीला पडलेल्या भेगा बुजून ओलावा जास्त काळ टिकून राहतो. 

पीक संरक्षण (फवारणी प्रति लिटर पाणी)
चक्रीभुंगा व उंट अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. नियंत्रणासाठी प्रोफेनोफॉस (५०% प्रवाही) २ मिली  

मूग
मूग पीक सध्या दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत पिकास पाण्याची गरज असते. उपलब्ध पाणी तुषार सिंचनाद्वारे द्यावे. 
भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, ( फवारणी प्रति लिटर पाणी) पाण्यात विरघळणारे गंधक, १ ग्रॅम 

तूर 
पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. त्यात पिकात वारंवार कोळपणी करावी.
पाण्याची सोय असल्यास तुषार सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
काही ठिकाणी तुरीवर मररोग दिसून येत आहे. नियंत्रणासाठी ( आळवणी प्रति लिटर पाणी)कॉपर ऑक्सिक्लोराईड ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २ ग्रॅम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com