पावसामुळे द्राक्षबागेत उद्‍भवणाऱ्या समस्या

डॉ. आर. जी. सोमकुंवर, डॉ. रोशनी समर्थ 
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

गेल्या आठवड्यामध्ये द्राक्ष विभागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला. या परतीच्या पावसामुळे या वेळी द्राक्षबागेमध्ये असलेल्या विविध अवस्थांमध्ये काही समस्या उद्भवू शकतात. या संभाव्य समस्या लक्षात घेता पुढील उपाययोजना करणे महत्त्वाचे असेल. 

फळछाटणीस उशीर असलेली द्राक्षबाग  
या बागेत काडीची परिपक्वता झाली असेल किंवा ती शेवटच्या टप्प्यात असेल. अशा बागेमध्ये या सतत होत असलेल्या पावसामुळे मातीच्या प्रत्येक कणांमध्ये पाणी जमा होऊन, आर्द्रतेचे प्रमाण वाढले असेल. परिणामी, नवीन फुटी जास्त जोमात निघताना दिसतील. 
अशी परिस्थितीमध्ये काडीवर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. पाऊस सतत सुरू असल्यास कोवळ्या फुटींवर करपा रोगाचा प्रादुर्भावसुद्धा दिसून येईल. 

फळछाटणी झालेली द्राक्षबाग 
या बागेमध्ये आता डोळे फुटून नवीन फुटी निघाल्या आहेत. या फुटी निघण्याकरिता वाढरोधकांचा वापर केला गेला होता. मात्र, बागेमध्ये यापूर्वीच्या पावसामुळे आधीच बऱ्यापैकी पानगळ झाली होती. वास्तविक रसायनांचा वापर जास्त गरजेचा नव्हता. 
या वेळी वाढते तापमान व आर्द्रता ही बागेमध्ये काडीवर डोळे फुटण्यासाठी फायद्याची ठरली. म्हणूनच काडीवर जितक्या डोळ्यावर पेस्टिंग केले त्यापेक्षा जास्त डोळे फुटलेले दिसून येतील. 
या वेळी सतत होणाऱ्या पावसामुळे आर्द्रता वाढली असून, काडीवर कॅनोपीही जास्त प्रमाणात तयार झाली असेल. या परिस्थितीमध्ये जर पाऊस पुन्हा आल्यास घड कुजण्याची समस्या दिसून येईल. याच सोबत, जर १-२ पाने अवस्था असल्यास वाढत्या आर्द्रतेमध्ये वेलींमध्ये जिबरेलीन्सची पातळी वाढेल. परिणामी, घड जिरण्याची समस्या सुरू होईल. 

उपाययोजना  
या वेळी वेलींमध्ये घडांची कूज थांबविण्याकरिता मोकळी कॅनोपी गरजेची असेल. त्यामुळे बागेत निघालेल्या सर्व फुटींपैकी आवश्यक फुटी राखाव्यात, अन्य फुटी कमी कराव्यात. यानंतर वेलीची मजबुती वाढवून सशक्तपणा येण्यासाठी पालाश १ ते १.५ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
घड जिरण्यापासून संरक्षण करणे या वेळी महत्त्वाचे आहे. त्यासाठी वेलीतील जिबरेलिन्सची मात्रा कमी करून सायटोकायनीन वाढवणे जास्त गरजेचे आहे. या वेळी शिफारशीत सायटोकायनीनयुक्त संजीवके ६-बीए, सीपीपीयू आणि पालाशची उपलब्धता वेलीस फवारणीद्वारे करणे आवश्यक आहे. 

उपाययोजना  
नवीन निघालेल्या फुटी आधी काढून बागेबाहेर टाकाव्यात. यामुळे रोगाचे बऱ्यापैकी नियंत्रण शक्य होईल.    ज्या बागेत फळछाटणीस एक महिना उशीर आहे, अशा बागेमध्ये या फुटी त्वरित काढाव्यात. कारण, त्यामुळे कोवळ्या काडीवरील करपा हा परिपक्व काडीमध्ये प्रवेश करून घडावर येऊ शकेल.     बागेत जास्त आर्द्रता व सुरू असलेल्या पावसामुळे नवीन फुटी लगेच येतील, तेव्हा यावर एक टक्के बोर्डो मिश्रणाची फवारणी फायद्याची ठरेल. कारण, या तीव्रतेमुळे कोवळ्या पानांवर स्कॉर्चिंग येईल. पाने पुढे वाढणार नाही. तसेच रोगही नियंत्रणात राहील.     काडीची परिपक्वता साधणे व काडी सशक्त करण्यासाठी पालाशची फवारणी या वेळी फायद्याची ठरेल.     ज्या बागेत सध्या करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तेथे थायोफिनाईट मिथाईल किंवा कार्बेन्डाझिम एक ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.    करपा रोगाचा प्रादुर्भाव ज्यास्त प्रमाणात वाढला तर फ्युओपायरम अधिक टेब्युकोनाझोल ०.५ मिलि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून ५ ते ७ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

फळछाटणीस उशीर असलेली द्राक्षबाग  
या बागेत काडीची परिपक्वता झाली असेल किंवा ती शेवटच्या टप्प्यात असेल. अशा बागेमध्ये या सतत होत असलेल्या पावसामुळे मातीच्या प्रत्येक कणांमध्ये पाणी जमा होऊन, आर्द्रतेचे प्रमाण वाढले असेल. परिणामी, नवीन फुटी जास्त जोमात निघताना दिसतील. 
अशी परिस्थितीमध्ये काडीवर डाऊनी मिल्ड्यूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येईल. पाऊस सतत सुरू असल्यास कोवळ्या फुटींवर करपा रोगाचा प्रादुर्भावसुद्धा दिसून येईल. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agriculture news Problems caused by rain