कागदी लिंबूवर शेंडेमर, सिट्रस सायलाचा प्रादुर्भाव

दत्तात्रय जगताप, डॉ. सतीश बुलबुले 
गुरुवार, 27 जुलै 2017

शेंडेमर -
कोलेटोट्रायकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम हिरवट काळसर ठिपके पडून नंतर पानगळ होते.
नवीन व पक्व फांद्या वरून खालपर्यंत वाळण्यास सुरवात होते. त्यावर पांढरट वाढ होऊन बुरशीचे काळपट ठिपके दिसतात. 

शेंडेमर -
कोलेटोट्रायकम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानावर प्रथम हिरवट काळसर ठिपके पडून नंतर पानगळ होते.
नवीन व पक्व फांद्या वरून खालपर्यंत वाळण्यास सुरवात होते. त्यावर पांढरट वाढ होऊन बुरशीचे काळपट ठिपके दिसतात. 

नियंत्रण -
रोगग्रस्त फांद्या छाटून  बोर्डो पेस्ट लावावी. 
बहर घेताना प्रत्येक वेळेस झाडातील शेंडेमर ग्रस्त फांद्यांची छाटणी करावी. छाटणीकरिता वापरण्यात आलेली कात्री व अवजारे सोडियम हायपोक्लोराइट (१५ मि.लि. प्रतिलिटर पाणी) द्रावणातून निर्जंतुक करावीत
झाडांवर कार्बेडॅझिम १० ग्रॅम किंवा मँकोझेब २० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आलटून-पालटून ३ ते ४ फवारण्या.

सिट्रस सायला -
पिले आणि प्रौढ नवतीच्या पानातून रसशोषण करतात. शेंडेमर होते. फुलोरा झडतो. फांद्या वाळतात.
पिलांच्या शरीरातून स्रवलेल्या मद चिकट गोड पांढऱ्या पदार्थांवर काळी बुरशी वाढते.

नियंत्रण -
नवीन पालवी फुटण्याच्या वेळी क्विनॉलफॉस १ मि.लि. किंवा ॲसिफेट १ ग्रॅम किंवा नोव्हॅल्युरॉन ०.५५ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी.
गरजेनुसार दुसरी फवारणी १० ते १५ दिवसांनी करावी. कीटकनाशक बदलून वापरावे.

- डॉ. सतीश बुलबुले, ७५८८६९५३३५ (लेखक अखिल भारतीय समन्वयीत फळपिके संशोधन प्रकल्प, उद्यानविद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत आहेत)

Web Title: agro news