लागवड जिरायती गव्हाची...

लागवड जिरायती गव्हाची...

जिरायती गव्हाची लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. लागवडीसाठी नेत्रावती आणि पंचवटी या जाती निवडाव्यात. लागवड दक्षिणोत्तर करावी. लागवड उभी-आडवी न करता एकेरी करावी, म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते.

गव्हाच्या विशिष्ट वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित गहू उत्पादन मिळविणे शक्‍य आहे. जिरायती जमिनीत गव्हाचे चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित तंत्राचा अवलंब फायदेशीर ठरतो. 

गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन निवडावी.

गव्हाच्या मुळ्या ६० सें.मी. ते १ मीटर खोलीपर्यंत वाढतात. त्यामुळे योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असावी. मशागत करताना शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्‍टरी ४ ते ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळावे. जिरायती लागवड ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी.

बियाणे - प्रति हेक्‍टरी - ७५ ते १०० किलो 
बीजप्रक्रिया - कॅप्टन किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाणे
पेरणीचे तंत्र - जिरायत पेरणीसाठी दोन ओळीत २२.५ सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी दक्षिणोत्तर करावी. गव्हाची पेरणी उभी - आडवी न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे सोपे जाते.

पाणी व्यवस्थापन -
एकच पाणी देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
दोन पाणी देणे शक्‍य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
तीन पाणी देणे शक्‍य असल्यास पेरणीनंतर पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी, दुसरे ४० ते ४२ दिवसांनी व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.

टीप - गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते. दोन पाणी दिले तर उत्पादनात २० टक्के घट येते.

आंतरमशागत -
गव्हात जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी.
कोळपणी करून रोपांना मातीची भर द्यावी. आंतरमशागतीमुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
- डॉ. अविनाश गोसावी ७५८८००५९०५ (कृषी संशोधन केंद्र, निफाड, जि.नाशिक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com