राज्याच्या हवामानाची माहिती देणार ॲग्रोक्‍लायमॅटिक ॲटलास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 December 2017

नागपूर - राज्याच्या वातावरणात गेल्या दोन दशकांत झालेले बदल आणि त्या पार्श्‍वभूमीवर आजच्या घडीला कोणती पीकपद्धती कोणत्या विभागाला फायदेशीर ठरेल, याचा जिल्हानिहाय आढावा ‘ॲग्रोक्‍लायमॅटिक ॲटलास’ (कृषी-हवामान नकाशाचे पुस्तक) मधून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कृषी क्षेत्रात अशाप्रकारचा प्रयत्न प्रथमच झाला आहे. यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेंकटेश्‍वरलू यांनी पुढाकार घेतला आहे.

हवामानातील बदलाचा पिकाच्या संरचनेतदेखील बदल होऊ लागला आहे. त्यामुळे बदलत्या हवामानात तग धरणारे वाण विकसित करण्याचे आव्हान कृषी विद्यापीठांसमोर आहे. दरम्यान राज्यातील काही विद्यापीठांमध्ये हवामान बदलाशी संबंधित शास्त्रोक्‍त अभ्यास केला जात आहे. अकोला कृषी विद्यापीठाचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनिल करुणाकरन यांनी गेल्या दोन दशकांत वातावरणात झालेले हवामानातले बदल अभ्यासले आहेत. 

ॲटलास ठरणार मैलाचा दगड 
वातावरणातील बदलासंदर्भाने विखुरलेल्या स्वरूपात अभ्यास  सुरू आहे. त्याची बांधणी करीत अभ्यासकांसाठी तो उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न ॲग्रोक्‍लायमॅटिक ॲटलासच्या माध्यमातून पहिल्यांदाच होत आहे. चारही कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकीत यावर मंथन झाले होते. 

त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून यावर काम सुरू होते. परभणी विद्यापीठाच्या हवामान विभागाचे तज्ज्ञ यांची नोडल अधिकार म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. त्यांच्या नियंत्रणात २५ ते ३० बैठका राज्यातील चारही कृषी विद्यापीठात आजवर झाल्या. त्यासोबतच पुणे आणि दिल्ली येथील हवामान खात्याकडून देखील माहिती संकलित करण्यात आली.

प्रत्येक जिल्ह्याच्या हवामानाचा आढावा 
तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान यांसह वातावरणाशी निगडित बारकावे मांडण्याचा प्रयत्न या ॲटलासमध्ये करण्यात आला आहे. त्याआधारे पिकांची निवड करणे शक्‍य होणार आहे. विशेष म्हणजे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या हवामानाचा आढावा यात घेण्यात आला आहे.

हवामानाचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ॲग्रोक्‍लायमॅटिक ॲटलास महत्त्वाचे संदर्भ पुस्तक ठरणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून यावर काम सुरू होते. आता ते पूर्णत्वास गेले असून १४ डिसेंबर रोजी औरंगाबादेतील आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत त्याचे प्रकाशन होईल. 
- डॉ. वेंकटेश्‍वरलू, कुलगुरू, वनामकृवी, परभणी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news agroclimatic atlas