जनावरांच्या खाद्यात झाडपाला वापरताना काळजी घ्या

अजय गवळी, डॉ. विशाल केदारी
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

गवत आणि झाडांचा पाला यांच्यामध्ये आर्द्रता आणि शुष्कता हे दोन मुख्य भाग असतात. पानांच्या शुष्क भागात मुख्यत्वे ऊर्जा (कर्बोदके), प्रथिने आणि इतर भागात खनिजे असतात. जनावरांचे दूध उत्पादन कमी असते तेव्हाही त्यांना श्वसन तसेच शरीरातील वेगवेगळ्या क्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी उर्जेची आवश्यकता भासते. ही गरज प्रथिनांमधून भागवली जाते. लहान जनावरांमध्ये जलदगतीने वाढ व अधिक दुग्धोत्पादनासाठी अधिक ऊर्जा आणि प्रथिनांची आवश्यकता असते.

चाराटंचाईच्या काळात जनावरांच्या आहारात ठराविक प्रमाणात भेंड, असाना, अंजन, शिवण, शेवरी या झाडांचा पाला वापरता येतो. 

प्रथिने हा जनावरातील दूध व शरीरवाढीसाठी मुख्य घटक आहे. भात पेंढा, गव्हाचा पेंढा यामध्ये प्रथिनांचे प्रमाण कमी असते. म्हणून दुधाळ जनावरांना पायाभूत खाद्यासोबत पशू खाद्य काही प्रमाणात देणे गरजेचे आहे. कारण यामध्ये प्रथिनांचे प्रमाण समाधानकारक असते.

झाडपाला हा एक प्रथिनांचा मुख्य आणि स्वस्त स्रोत आहे. झाडपाल्यामध्ये सुमारे १० ते ३० टक्के शुष्क पदार्थांत उच्च दर्जाची प्रथिने आढळतात. २५ टक्के शुष्क पदार्थ असलेल्या एक किलो ताज्या झाडपाल्यामध्ये २५ ते ५० ग्रॅम प्रथिने आढळतात. 

ज्यावेळेस हिरव्या गवताची कमतरता जाणवते त्यावेळेस झाडांची पाने ही जनावराच्या खाद्याची (प्रथिने, ऊर्जा) पर्यायी व्यवस्था ठरते.

झाडपाल्याचा चारा म्हणून निवड करताना -
    झाडपाला व शेंगा यात विपुल प्रमाणात पोषण मूल्ये असावीत. प्रथिनांचे प्रमाण हे पानांमध्ये अधिक प्रमाणात असावे.
    निवडलेल्या झाडात पानांची छाटणी केल्यानंतर पानांची उगवण क्षमता असावी.
    झाडांचा खाण्यायोग्य भाग हा जनावरास हानिकारक नसावा. म्हणजेच त्यामध्ये कुपोषण करणारे घटक नसावेत.
    या वनस्पती दुष्काळी परिस्थितीला तसेच रोग व किडींना प्रतिकारक्षम असाव्यात.
    चाऱ्यासाठी झाडे निवडताना ती इतर पिकांच्या वाढीवर परिणाम करणारी नसावीत.
    झाडांची पाने जनावरांना सहज पचणारी असावीत.
    पशुतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार झाडपाल्याचा वापर करावा.
    रोग, किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड करावी.

- अजय गवळी - ८००७४४१७०२. (गवळी हे के. के. वाघ कृषी जैवतंत्रद्यान महाविद्यालय, नाशिक येथे तर डॉ. केदारी हे कृषी जैवतंत्रद्यान महाविद्यालय, लोणी, जि. नगर येथे कार्यरत आहेत.)

Web Title: agro news animal food