सोयाबीनच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

सोयाबीनच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण

सोयाबीन पिकावर सद्यस्थितीत शेंग पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पिकाचे वरून निरीक्षण केल्यास अळीचा प्रादुर्भाव दिसत नाही. त्यासाठी पिकाचे नियमित सर्वेक्षण करून वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात.
 

शेंग पोखरणारी अळी -
शास्त्रीय नाव - Spodoptera litura  
अन्य नावे - हिरवी अमेरिकन बोंडअळी, घाटे अळी. 
पिके - ही कीड बहुभक्षी असून तूर, हरभरा, वाटाणा, मूग, उडीद, मसूर, सोयाबीन, चवळी इ. कडधान्यांवर मोठ्या प्रमाणात आढळते; तर कपाशी, ज्वारी, टोमॅटो, तंबाकू, सूर्यफूल, करडई इ. पिकांवरही येते. 

नुकसान 
सुरवातीस अंडीतून बाहेर पडलेली लहान अळी सोयाबीनची कोवळी पाने खाते. पीक फुलोऱ्यावर आल्यानंतर कळ्या, फुले खाते. नंतर शेंगांना अनियमित आकाराचे मोठे छिद्र पाडून आत शिरते. शेंगेतील अपरिपक्व; तसेच परिपक्व झालेले दाणे खाऊन टाकते. 
वातावरण ढगाळ असलताना या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. 
किडीचा जीवनक्रम ४ ते ५ आठवड्यांत पूर्ण 
होतो.

नियंत्रण 
पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडींच्या पूरक वनस्पतींचा नाश करावा.
शेतात ठिकठिकाणी पिकांच्या उंचीपेक्षा साधारणपणे एक ते दीड उंचीचे पक्षी थांबे उभारावेत. त्यावर पक्षी बसून अळ्यांना टिपतात.
शेतात हेक्‍टरी किमान ५- १० कामगंध सापळे लावावेत. सापळ्यांमध्ये प्रतिदिन ८-१० पतंग सतत २-३ दिवस आढळल्यास किडीच्या नियंत्रणाची उपाययोजना करावी. सापळ्यात जमा झालेले पतंग नष्ट करावेत.
- डॉ. ए. व्ही. कोल्हे, ९९२२९२२२९४ (कीटकशास्त्र विभाग, डॉ. पंजाबराव 
देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)

फवारणी 
बॅसीलस थुरीन्जिएन्सीस (सीरोटाईप एच-३९, ३ बी स्ट्रेन झेड- ५२) १.५ ग्रॅम प्रतिलिटर. आवश्‍यकता भासल्यास १० ते १२ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी. 
टीप - फवारणीचे द्रावण फुले, कळ्या व शेंगापर्यंत पोचेल, याची काळजी घ्यावी.

कीडनाशके संजीवके वापरासंबंधी

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.

बॅन किंवा -‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.

लेबल क्लेम वाचावेत.

पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com