धान्य वहनासाठी न्यूमॅटिक तंत्रावरील कन्व्हेअर विकसित

मोबाईल ग्रॅन्युल कन्वेअरचे उद्‌घाटन करताना भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी.
मोबाईल ग्रॅन्युल कन्वेअरचे उद्‌घाटन करताना भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेचे अधिकारी.

तंजावर (तमिळनाडू) येथील भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेमध्ये न्यूमॅटिक तंत्रावर चालणाऱ्या मोबाईल ग्रॅन्युल कन्वेअरची निर्मिती केली आहे. हा कन्व्हेअर सामान्यतः धान्य गिरण्यांमध्ये कमी अंतर किंवा उंचीवरील धान्याच्या वहनासाठी उत्तम असून, मनुष्यबळावरील अवलंबित्व कमी होते. 

भारतामध्ये बहुतांश धान्य गिरण्यांमध्ये धान्यातील आर्द्रता कमी करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर करतात. मात्र, त्यासाठी यार्डमध्ये धान्य वाळण्यास ठेवले जाते. यामध्ये यार्ड ते गिरणीपर्यंत धान्याची वाहतूक माणसांच्या साह्याने करावी लागते. त्यात अवचित पाऊस आल्यास एकदम सर्व धान्य पावसापासून वाचवणे शक्य होत नाही. असे धान्य वाळविण्यासाठी वेळ लागतो, तसेच ते सर्वसमान पद्धतीने वाळविले जात नाही. ओलसर धान्यावर प्रक्रिया करताना धान्य तुटण्याचे प्रमाण खूपच जास्त असते. कारखान्यातील धुळयुक्त वातावरणामुळे धान्यात कचरा व धुळीचे प्रमाण वाढते. धान्य वाहतूक करताना जमिनीवर सांडण्याचे प्रमाणही खूप असते. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तंजावर (तमिळनाडू) येथील भारतीय अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान संस्थेमध्ये न्यूमॅटिक तंत्रावर चालणाऱ्या मोबाईल ग्रॅन्युल कन्वेअरची निर्मिती केली आहे. या पंपाला चाकांची सोय केलेली असल्यामुळे तो कोठेही नेणे सुलभ होते. 

न्यूमॅटिक कन्व्हेअर यंत्रणेची कार्यपद्धती 
हवेच्या साह्याने घनपदार्थांच्या वहनाला ‘न्यूमॅटिक कन्व्हेयिंग’ असे म्हणतात. एका पाइपच्या वायूचा प्रवाह तयार केला जातो. त्याद्वारे धान्य पुढे पाठवले जाते. हवेचा दाब कमी अधिक करण्यातून धान्य उचलले जाते. यंत्रणेमध्ये विशिष्ट ताकदीने हवा ओढू शकतील असे पंप बसविलेले असतात. या पंपातून हवेच्या विशिष्ठ वेगाने (३ पीएसआय दाब) धान्य ओढले जाते. हवेचा दाब जास्त असल्यास धान्य ओढण्याचा वेग कमी असतो. परिणामी धान्य तुटण्याचे प्रमाण कमी राहते.

ही पद्धती हायड्रोलिक किंवा अर्धद्रव वहनाच्या पद्धतीपेक्षा भिन्न आहे. 
मेकॅनिकल कन्व्हेअरच्या तुलनेमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे धान्य उचलले जाते. तसेच याचा देखभाल खर्चही कमी आहे.

यंत्राची वैशिष्ट्ये
ही यंत्रणा हवेच्या दाबातील फरकावर चालते. 
ही यंत्रणा ३० फूट उंचीपर्यंत किंवा आडवे १५० फूट लांबवर वाहून नेता येते.
या यंत्रणा वापरण्याचा प्रतिदिन (आठ तासांसाठी) खर्च मजुरासह ५५० रुपये इतका कमी येतो. 
प्रतितास फक्त ४ किलोवॉट इतकी ऊर्जा लागते.
या यंत्रणेला चाके लावलेली असून, यंत्रणा चालविण्यासाठी एक अर्धकुशल मजूर पुरेसा होतो. 
या यंत्रणेच्या साह्याने २.५ टन तांदूळ व ३.८ टन डाळ प्रतितास उचलता येते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com