योग्य पक्वतेला करा पेरू फळांची काढणी

डॉ. जितेंद्र ढेमरे, डॉ. विक्रम कड
गुरुवार, 20 जुलै 2017

फुले आल्यानंतर ९० ते १५० दिवसांत पेरूची फळे काढणीसाठी तयार होतात. सर्वच फळे एकाच दिवशी तयार होत नाहीत.  पक्व झालेली फळे ३-४ दिवसांच्या अंतराने शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना काढावीत व काळजीपूर्वक हाताळावीत.

आकाराने पूर्ण वाढलेली आणि रंग बदललेल्या फळांची काढणी करावी. दूरवरच्या बाजारपेठांसाठी पक्व झालेली, अर्धी पिकलेली मात्र घट्ट फळे काढावीत. पूर्ण पिकलेली फळे स्थानिक बाजारपेठेसाठी पाठवावीत. फळांचा रंग व आकारमानानुसार प्रतवारी करून ती बांबूच्या पानांचा नरम थर देऊन पॅक करावीत. 

फळांची साठवण
फळांचे पॅकिंग करताना करंड्यात वाळलेल्या गवताचा आच्छादन म्हणून वापर करावा. 

पेरूची फळे जास्त दिवस टिकत नाहीत. फळ काढल्यानंतर ३-४ दिवसांपर्यंत चांगल्या स्थितीत राहू शकतात. फळे पॉलिथिनच्या पिशवीला उपलब्ध क्षेत्रफळाच्या ०.५ ते १ टक्का छिद्रे पाडून ९ दिवसांपर्यंत फळांचे आयुष्य वाढविता येते. 

फळे ८ ते १० अंश सेल्सिअस तापमानाला व ८५ ते ९० टक्के आर्द्रतेला २ ते ३ आठवड्यांपर्यंत साठविता येतात. त्याचप्रमाणे प्रमाणित वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा जास्त व ऑक्सिजनचे प्रमाण ५ टक्क्यांपेक्षा कमी करून फळाचे आयुष्य १ महिन्यांपर्यंत वाढविता येते.

- डॉ. जितेंद्र ढेमरे, ७५८८९५५५०० (काढणीपश्चात तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Web Title: agro news Correct guava Fruit Peruvian Harvesting