शंभर लाख कापूस गाठी खरेदी करा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

भारतीय कापूस महासंघाची मागणी; सलग तिसऱ्या वर्षात उत्पादनवाढीची शक्‍यता 
नवी दिल्ली - देशात यंदाच्या २०१७-१८ (आक्‍टोबर-सप्टेंबर) हंगामात कापसाचे भरघोस उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यामुळे आवक वाढून दर कमी होऊ नयेत, यासाठी सीसीआयद्वारे १०० लाख कापूस गाठींची (एक कापूस गाठ-१७० किलो) खरेदी करण्याचे निर्देश केंद्राने द्यावे, अशी मागणी भारतीय कापस महासंघाने (आयसीएफ) नुकतीच केली आहे.

आयसीएफने म्हटले आहे, की यंदाच्या खरीप हंगामात कापूस पेरा सुमारे १२२.६ लाख हेक्‍टरपर्यंत झाला असल्याची नोंद आहे. अनुकूल हवामान आणि चांगल्या पावासमुळे सलग तिसऱ्या वर्षात देशामध्ये कापसाचे भरघोस उत्पादन होईल, अशी शक्‍यता आहे. २०१७-१८ हंगामात ४०० लाख कापूस गाठींचे उत्पादन शक्‍य आहे. देशातील विविध जीनिंग मीलचा कापूस वापर ३०० ते ३१० लाख कापूस गाठी राहील, असा अंदाज आहे. 

भारतीय शेतकरी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत सुमारे ७० टक्के कापूस बाजारात आणतात. या कापसाची अंदाजे किंमत ५८ हजार ३०० कोटी रुपये असते. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीच्या (आयसीएसी) एका अहवालानुसार उत्पादनवाढीचा अंदाज असल्याने भारताप्रमाणेच इतर काही देशांनाही अतिरिक्त कापसाचा प्रश्‍न भेडसावणार आहे. 

आयात, निर्यात आणि दराचे चक्र
अनुदान देऊन किंवा इतर बाबींद्वारे कापूस निर्यात वाढविण्याचे प्रयत्न केले जातात; मात्र याचा नकारात्मक परिणाम होत असतो. कारण, यामुळे जागतिक कापसाच्या किमती कमी होतात. याचा देशांतर्गत वा स्थानिक बाजारातील दरांवर परिणाम होतो आणि पुन्हा कापसाची निर्यात करावी लागते. असे हे आयात, निर्यात आणि दराचे चक्र असल्याचे भारतीय कापूस महासंघाचे म्हणणे आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news cotton purchasing