कर्नाटकमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची विधिमंडळात घोषणा; तत्काळ प्रभावाने होणार लागू
बंगळुरू कर्नाटक - राज्यातील शेतकरी मोठ्या आथिक अडचणीत आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी पीक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे, अशी घोषणा कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बुधवारी (ता. २१) विधिमंडळात केली. ही कर्जमाफी तत्काळ प्रभावाने लागू होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, की राज्यात गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळसदृश स्थिती आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा देण्यासाठी सरकारने पीक   कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा सरकारी बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या २२ लाख २७ हजार ५०६ शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकऱ्यांवर असलेले सुमारे ५० हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षाकडून शेतकरी प्रश्नांवर राज्य सरकारवर हल्लाबोल होत होता. तसेच कर्जमाफीची मागणीही लावून धरण्यात आली होती. 

कर्जमाफीतील वैशिष्ट्यपूर्ण बाबी

२२ लाख २७ हजार ५०६ शेतकऱ्यांना मिळणार लाभ 

२० जूनपर्यंतचे ५० हजारांपर्यंतचे पीककर्ज/अल्पमुदत कर्ज माफ होणार

पीक कर्जमाफीच्या या निर्णयामुळे सिद्धरामय्या यांचे कॉंग्रेस सरकार गोरगरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत असल्याचा विश्वास निर्माण होणार आहे.
- राहुल गांधी, उपाध्यक्ष, कॉंग्रेस

केंद्र सरकारने कर्जमाफीसंदर्भात शेतकरीहिताचा निर्णय घेऊन राज्यांना मदत केली पाहिजे. 
-सिद्धरामय्या, मुख्यमंत्री, कर्नाटक

राज्य सरकारने चांगला निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांसाठी आपण सर्व मिळून केंद्रीय मदत मिळविण्याचा प्रयत्न करूया.
- जगदीश शेट्टर, विरोधी पक्षनेते

Web Title: agro news farmer loanwaiver in karanataka