पंजाबमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी - मुख्यमंत्री अमरिंदरसिं

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

चंडीगड, पंजाब - पंजाबातील अल्पभूधारक आणि लहान शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा सोमवारी (ता. १९) केली.  

दरम्यान, मंगळवारी (ता. २०) सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने १५०० कोटींची तरतूद केली आहे. राज्याचे अर्थमंत्री मनप्रित सिंग बादल यांनी अर्थसंकल्प सादर करताना निधीची घोषणा विधिमंडळात केली.  पंजाबमध्ये (२०१७-१८) कृषीसाठी एकूण १०५८०.९९ कोटींची एकूण तरतूद करण्यात आली. गतवर्षाच्या तुलनेत सुमारे ६५ टक्क्यांनी वाढ केल्याचे बादल यांनी स्पष्ट केले.

अर्थमंत्री मनप्रित बादल म्हणाले, की शेतकरी हितासाठी काँग्रेसने आधी दिलेल्या आश्‍वासनानुसार निर्णय घेण्यात आला आहे. याविषयी राज्यात एका समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी १५०० कोटींची वेगळी तरतूद करण्यात येत आहे. तसेच यंदा कृषीच्या एकूण तरतुदीतही सुमार े६५ टक्क्यांनी वाढ केली आहे.

मुख्यमंत्री अमरिंदरसिंग  सिंग यांनी सोमवारी (ता. १९) अल्पभूधारक शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज माफ केल्याचे जाहीर केले होते. तसेच पाच एकराहून थोडी अधिक जमीन असलेल्या इतर शेतकऱ्यांनाही कर्जामध्ये दोन लाख रुपयांची सूट जाहीर केली आहे. या निर्णयाचा पंजाबमधील दहा लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाही तीन लाख रुपयांऐवजी पाच लाख रुपये नुकसानभरपाई देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. 

कोणतीही मागणी नसताना राज्य सरकारने केवळ लहान शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन हा निणय घेतल्याचे काँग्रेसने सांगितले. मात्र, विरोधकांनी कर्जमाफीबाबत सांशकता व्यक्त करून अधिक घटकांनाही यात समावेश करून घेण्याची मागणी केली आहे. 
 
सोमवारी झालेले मंत्रिमंडळाचे निर्णय
अल्पभूधारकांचे २ लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ केले जाणार
पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असलेल्यांनाही कर्जमाफीत सूट मिळणार
पंजाबमधील १०.२५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
शेतकरी आत्महत्यग्रस्त कुटुंबाच्या कर्जाची जबाबदारी राज्य सरकार 
घेणार. पंजाब कृषी कर्ज अधिनियमात संशोधन तसेच याविषयी समितीही स्थापन
उद्योगांना ५ रुपये प्रति युनिट वीज देण्यात येणार
मोठ्या शेतकऱ्यांनी वीज अनुदान सोडण्याचे आवाहन

पंजाबमधील शेतकरी ७० वर्षांपासून देशाला धान्यपुरवठा करीत आहेत. परंतु त्यांची परिस्थिती मात्र हलाखीची झाली आहे. त्यामुळे अनेक वेळा त्यांच्याकडून आत्महत्येसारखी टोकाची भूमिकाही घेतली जाते. कर्जमाफीने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.-मनप्रित सिंग बादल, अर्थमंत्री, पंजाब

राज्याचा खजिना रिता आहे,  आर्थिक स्थिती नाजूक असताना आणि मागणी नसताना पंजाबातील लहान शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ढासाळलेली आहे. यामुळे कर्जमाफीचा निर्णय पंजाब सरकारने घेतला 
- काँग्रेस

याला म्हणतात सरकार. ना 
अांदोलन, ना कुठली हानी, ना कुठली नासाडी. काँग्रेसच शेतकऱ्याच्या हिताचे सरकार आहे. महाष्ट्रातले सरकार अभ्यास करतंय म्हणे. यांचा अभ्यास कवाबरं पूर्ण व्हायचा. २०१९ला का?
- अशोक सोमासे

Web Title: agro news farmer loanwaiver in punjab