तृणधान्यापासून बनवा खाद्यपदार्थ

डॉ. एस. डी. कुलकर्णी
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

अलीकडे एक धान्यापेक्षा जास्त धान्याच्या पिठाच्या मिश्रणाला चांगली मागणी आहे. अशा पिठामध्ये तृणधान्याचा समावेश असतोच. वयस्क लोकांच्याबरोबरीने तरुणांमध्येही अशा खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी खाद्य विभागाकडे नोंदणी करावी.

अलीकडे एक धान्यापेक्षा जास्त धान्याच्या पिठाच्या मिश्रणाला चांगली मागणी आहे. अशा पिठामध्ये तृणधान्याचा समावेश असतोच. वयस्क लोकांच्याबरोबरीने तरुणांमध्येही अशा खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. प्रक्रिया उद्योग सुरू करण्यापूर्वी खाद्य विभागाकडे नोंदणी करावी.

तृणधान्यापासून तयार केलेल्या पारंपरिक खाद्यपदार्थांना बाजारपेठेत मागणी वाढत आहे. गरज आहे ती योग्य प्रकारे पॅकिंग करून ग्राहकांपर्यंत पोचविण्याची. ज्वारी, बाजरी, नाचणीचे पापड; तसेच पापड्या, खारोड्यांना शहरी भागातही मागणी आहे. बाजरीचा खिचडा (तूप, गुळासहित), नाचणीची खीर, वरी व राळ्याच्या तांदळाची खीर,ज्वारी, बाजरीच्या लाह्या अशा खाद्यपदार्थांना ग्रामीण भागाच्या बरोबरीने शहरी भागातही चांगली मागणी आहे. अलीकडे एक धान्यापेक्षा जास्त धान्याच्या पिठाच्या मिश्रणाला मागणी आहे. अशा पिठामध्ये तृणधान्याचा समावेश असतोच. वेगवेगळ्या धान्यांच्या कण्या एकत्र करून खाद्यपदार्थ तयार केला जातो. वयस्क लोकांबरोबरीने तरुणांकडूनही अशा खाद्यपदार्थांची मागणी वाढत 
आहे.

काही लोकांना गव्हाचे खाद्यपदार्थ पचत नाहीत. कारण त्यामध्ये ग्लुटेन असते. अशांसाठी विविध तृणधान्य, ज्वारी, मक्यापासून यांच्या पिठापासून तयार केलेला खाद्यपदार्थ हा एक चांगला पर्याय असतो. यामध्ये सुशिक्षित उद्योजकांसाठी चांगली संधी आहे. अशाच प्रकारचे विशिष्ट तृणधान्याचे पीठ मिश्रण तयार करून त्याचा उपयोग ब्रेड तयार करण्यासाठी होतो. परदेशात अशा पद्धतीचे ब्रेड मिळतात.  

स्नॅक्स पदार्थ 
बाजारात लहान मुलांसाठी विविध चवीचे स्नॅक्स पदार्थ उपलब्ध आहेत. मात्र त्यामध्ये पोषणमूल्य फार कमी असतात. मुलांच्या वाढीसाठी ऊर्जेची गरज आहे. म्हणून अशा उत्पादनात ऊर्जा, खनिजांच्या उपलब्धतेसाठी तृणधान्य, प्रक्रिया केलेल्या सोयाबीनचा वापर करून पौष्टिक स्नॅक्‍स तयार करता येतात. वयस्कर लोकांना कमी तेल खाण्याचा सल्ला दिला जातो.

त्यांच्यासाठी तेलरहित व तृणधान्ये, सोयाबीनमिश्रित स्नॅक्‍स तयार करणे शक्य आहे. मात्र अशा उद्योगासाठी १० ते १५ लाख रुपयांची गुंतवणूक लागते. 

तृणधान्यांचे माल्ट 
  लहान बाळांच्या आहारामध्ये नाचणी माल्टचा उपयोग चांगल्या केला जातो. त्याचप्रकारे तृणधान्याला मोड आणून त्याचे पीठ तयार करता येते. हे पीठ वयस्क लोकांसाठी पाचक पदार्थ म्हणून उपयुक्त 
आहे. 

लाह्या
 बाजरी, राजगिरा, ज्वारी, मका यांच्यापासून चांगल्या गुणवत्तेच्या लाह्या किंवा गूळ वापरून लाह्यांचे गोड लाडूही तयार करता येतात.

सातूचे पीठ 
 सातूचे पीठ दूध किंवा पाण्यात मिश्रण करून खाण्याची पद्धत आहे. हरभरा, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, रागी मिसळून उच्च गुणवत्तेचे 
सातूचे पीठ तयार तयार करता येते. हे पीठ पौष्टिकही असते.

तृणधान्य प्रक्रिया यंत्रे 
 धान्यापासून खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी प्रथम त्याची 
स्वच्छता आणि प्रतवारी आवश्यक असते. तृणधान्ये लहान आकाराची असतात. त्यामुळे साधारण चाळणी वापरून स्वच्छ करणे सहज शक्‍य होत नाही. यासाठी विशिष्ट चाळणीची गरज असते. आता धान्य चाळण्यासाठी विशेष यंत्र मिळते. 
 कण्या व पीठ तयार करण्यासाठी हॅमर मिल उपयोगी ठरते.
 स्नॅक्‍स तयार करण्यासाठी एक्‍स्ट्रूजन कुकरचा वापर करावा. 
 धान्यावरील टरफले काढण्यासाठी यंत्रे उपलब्ध आहेत.

- डॉ. एस. डी. कुलकर्णी, ९७५२२७५३०४, (लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news food making by cereals