शेडनेट, इन्सेक्टनेट बाजारपेठेमध्ये गरवारे वॉल रोप्सची मुद्रा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या शेडनेट, इन्सेक्टनेट निर्मितीमध्ये गरवारे वॉल रोप्स लि. ही महत्त्वपूर्ण कंपनी असून, तिचा एकूण भारतीय बाजारपेठेमध्ये सुमारे ३५ टक्के वाटा आहे. त्यानंतर पिकांचे गारांपासून संरक्षण करण्यासाठी अॅण्टिहेलनेट, कार्नेशन, द्राक्षे किंवा वेलवर्गीय पिकांना आधार देण्यासाठी सपोर्टनेट किंवा फळे, भाज्यांचे पक्ष्यांपासून संरक्षणासाठी बर्डनेट या अन्य प्रमुख उत्पादनांनीही बाजारपेठेमध्ये आपले स्थान निर्माण केले असल्याची माहिती कंपनीचे कार्यकारी अधिकारी सुजॉय रहेमान आणि तंत्रज्ञान, नवीन व्यवसाय विभागाचे अध्यक्ष एस. व्ही. राऊत यांनी दिली.  

१९७६ मध्ये वॉल इंडस्ट्रीज इन कॉर्पोरेशन यांच्यासह गरवारे वॉल रोप्स लि. या कंपनीची स्थापना झाली. प्राधान्याने अॅक्वापोनिक्स व फिशरीजमधील विविध प्रकारचे नेट, दोर, शेतीमध्ये वापरले जाणारे शेडनेट, इन्सेक्टनेट या उत्पादनांची निर्मिती केली जाते. कंपनीची उलाढाल गेल्या पाच वर्षांमध्ये ५९९.३७ कोटी रुपयांवरून ८६५.२८ कोटी रुपये इतकी झाली आहे. कंपनीचे पुणे येथे मुख्य कार्यालय असून, अमेरिका, इंग्लंड, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये कार्यालये आहेत. सध्या सुमारे ७५ देशांमध्ये विविध उत्पादनांची विक्री व तत्पश्चात सेवा दिली जाते. उत्पादनामध्ये कृषी क्षेत्रासाठी अॅण्टिबर्ड नेटिंग, अॅण्टिहेल नेट, शेड नेट, सेरीकल्चर नेट, फ्लोरिकल्चर नेट, इन्सेक्ट नेट, ग्रेप नेट, क्रॉप सपोर्ट, बनाना रोप्स, स्टेकिंग कॉर्ड आणि फिशरीज व ॲक्वाकल्चर उद्योगासाठी ट्रॉल्स, पर्स सेईन नेटिंग, गील नेटिंग, डोले नेटिंग, पॅलाजिक नेटिंग, रोप्स ट्विन्स आहेत.

अॅक्वाकल्चर 
अॅक्वाकल्चरमध्ये नॉर्वे देश पहिल्या क्रमांकावर असून, चिली, ऑस्ट्रेलिया व अन्य देशांचा त्यानंतर क्रमांक लागतो. या देशांमध्ये सागरी मासेमारीसाठी पूर्वी नायलॉन नेट व कॉपरचा वापर होत असे. मात्र, या जाळ्यामध्ये शेवाळ तयार होई. त्याला गरवारे कंपनीतर्फे एचडीपीईमधील नेटचा पर्याय दिला आहे. याअंतर्गत कंपनीच्या पेटंटेड स्टार आणि सफायर केजेसना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उत्तम मागणी आहे. अॅण्टिप्रीडॅटर नेट ही कल्पना रुजवण्यामध्ये कंपनीचा मोठा वाटा आहे. पुढील टप्प्यामध्ये चिली देशामध्ये विस्ताराचे प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुजॉय रहेमान यांनी दिली. 

भारतातील अॅक्वाकल्चर उद्योगाचा विकास आणि संशोधनाबाबत माहिती देताना रहेमान यांनी सांगितले, की कंपनीने कोची येथील सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्या प्रक्षेत्रामध्ये चार मॉडेल फार्म तयार केले आहेत.   

महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थान येथील काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण व अन्य स्वरूपाची कामे सुरू आहेत. 

Web Title: agro news garware wall rops image in shadenet insectnet market