स्वस्तातील सापळ्यांमुळे कंदमाशी नियंत्रणास मिळाली मदत

विकास जाधव
मंगळवार, 25 जुलै 2017

कुसवडे, जि. सातारा येथील योगेश जगन्नाथ यादव यांच्याकडे आल्यासह सोयबीन, गहू, भात ही पिके असतात. गावामध्ये अन्य शेतकऱ्यांकडेही आले पीक मोठ्या क्षेत्रावर असते. या पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. सातत्याने फवारणी करूनही कंदमाशी नियंत्रणात येत नसल्याने अनेकांनी आले पीक काढून टाकले. त्यात दोन वर्षांपूर्वी योगेशही होता. मात्र, योगेश यांनी यावर मार्ग काढण्यासाठी कृषी सहायक अंकुश सोनवले यांची भेट घेतली. कंदमाशीच्या नियंत्रणासाठी कमी खर्चातील विविध सापळ्यांची माहिती मिळाली.

कुसवडे, जि. सातारा येथील योगेश जगन्नाथ यादव यांच्याकडे आल्यासह सोयबीन, गहू, भात ही पिके असतात. गावामध्ये अन्य शेतकऱ्यांकडेही आले पीक मोठ्या क्षेत्रावर असते. या पिकामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. सातत्याने फवारणी करूनही कंदमाशी नियंत्रणात येत नसल्याने अनेकांनी आले पीक काढून टाकले. त्यात दोन वर्षांपूर्वी योगेशही होता. मात्र, योगेश यांनी यावर मार्ग काढण्यासाठी कृषी सहायक अंकुश सोनवले यांची भेट घेतली. कंदमाशीच्या नियंत्रणासाठी कमी खर्चातील विविध सापळ्यांची माहिती मिळाली. या सापळ्याचा नव्या आले पिकामध्ये वापर सुरू केला असून, फवारणीच्या खर्चामध्ये बचत झाल्याचे योगेश यांनी सांगितले. 

प्लॅस्टिक बाटलीपासून बनवला मिथिल युजेनॉल सापळा
साधारण मे किंवा जूनच्या सुरवातीस एक एकर क्षेत्रावर आल्याची लागवड केली जाते. पावसाळ्यात प्रामुख्याने जुलै व ऑगस्ट महिन्यात आले पिकांवर कंदमाशीचा प्रादुर्भाव होतो. हे जाणून या काळात योगेश यांनी प्लॅस्टिक बाटल्यापासून मिथिल युजेनॉलचे सापळे तयार करून वापरले आहेत. 
 पाण्याची प्लॅस्टिक बाटली मधोमध त्रिकोणी कापली. काप घेतलेल्या जागेच्या वरील बाजूला मिथिल युजेनॉल द्रावणामध्ये सुतळी बुडवून तारेच्या साह्याने अडकवली. खालील भागामध्ये पाणी भरले.

एक एकर क्षेत्रामध्ये आठ सापळे काठीच्या साह्याने पिकाच्या थोडे वरपर्यंत येईल, अशा रितीने लावले.

या मिथिल युजेनॉलच्या गंधामुळे कंदमाश्या आकर्षित होऊन सापळ्यात अडकतात. या कंदमाश्‍या पाण्यात पडून मरतात. गेल्या वर्षी या सापळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात कंदमाश्या सापडल्या. त्यामुळे प्रत्येक तीन दिवसाला पाणी बदलावे लागत होते. या सापळ्यासह अन्य उपाययोजनांमुळे कंदमाशी प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात यश आले. 
हा सापळा नाममात्र किमतीत तयार होतो. 
आले पिकातील यश लक्षात आल्याने योगेश गेल्या दोन वर्षापासून गहू व भात पिकातही कामगंध सापळ्याचा वापर करू लागले. त्या सोबत रस शोषक कीडी नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे वापरत आहेत. 

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी  
पाणी व खते देण्यासाठी ठिबक सिंचन केले जाते.
रसशोषत किडीच्या नियंत्रणासाठी चिकट सापळे वापरतात. 
कंदमाशीसाठी मिथिल युजेनॉल सापळे एकरी आठ; तर कामगंध सापळे एकरी २० ते २२ सापळे लावतात. किडीच्या सर्वेक्षणासह नियंत्रणामध्ये त्यांचा उपयोग होतो.
आल्यासह भात व गहू या पिकांतही सापळ्याचा वापर करतात.

- योगेश जगन्नाथ यादव, ९५६१४८४००२, कुसवडे, ता. जि. सातारा.

Web Title: agro news Helps get control of the kandama to cheap