शेळीच्या आहारातील विविध घटकांचे महत्त्व

डॉ. तेजस शेंडे
बुधवार, 26 जुलै 2017

शेळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी, प्रजननासाठी खनिजे, जीवनसत्त्वे अाणि काही महत्त्वाच्या अन्नघटकांची गरज असते. या घटकांचा समतोल योग्य प्रमाणात राखला नाही, तर शेळ्यांमध्ये विविध प्रकारचे अाजार अाढळून येता;त तसेच वाढ खुंटणे, हाडांची वाढ कमी होणे, वजन कमी होणे इ.समस्या उद्भवतात. 

अाहारात लागणाऱ्या खनिजाचे महत्त्व व प्रमाण
कॅल्शिअम  

अभावामुळे दिसणारी लक्षणे - वाढ खुंटते, हाडे ठिसूळ बनतात.
अावश्यकता - ०.३-०.८ टक्के. 
खाद्याचा स्रोत - दूध, हिरवा चारा

शेळ्यांच्या चांगल्या वाढीसाठी, प्रजननासाठी खनिजे, जीवनसत्त्वे अाणि काही महत्त्वाच्या अन्नघटकांची गरज असते. या घटकांचा समतोल योग्य प्रमाणात राखला नाही, तर शेळ्यांमध्ये विविध प्रकारचे अाजार अाढळून येता;त तसेच वाढ खुंटणे, हाडांची वाढ कमी होणे, वजन कमी होणे इ.समस्या उद्भवतात. 

अाहारात लागणाऱ्या खनिजाचे महत्त्व व प्रमाण
कॅल्शिअम  

अभावामुळे दिसणारी लक्षणे - वाढ खुंटते, हाडे ठिसूळ बनतात.
अावश्यकता - ०.३-०.८ टक्के. 
खाद्याचा स्रोत - दूध, हिरवा चारा

फॉस्फरस  
अभावामुळे दिसणारी लक्षणे - वाढ खुंटते, हाडांची वाढ कमी होते, माती चाटतात, प्रजनन क्षमता खालावते.
अावश्यकता - ०.२५-०.४८ टक्के. 
खाद्याचा स्रोत - तृणधान्ये.

मॅग्नेशिअम  
अभावामुळे दिसणारी लक्षणे - वजन कमी होते, लाळ गळते, पाय ताठरतात, चक्कर येऊन करडे मरतात. 
अावश्यकता - ०.१८-०.४ टक्के.
खाद्याचा स्रोत - भुसा व पेंड.

सोडिअम  
अभावामुळे दिसणारी लक्षणे - भूक मंदावते, वाढ हळू होते, मज्जासंस्थेचे विकार होतात व रक्ताभिसरण मंदावते. 
अावश्यकता -०.२ टक्के. 
खाद्याचा स्रोत - मीठ.

तांबे (कॉपर)
अभावामुळे दिसणारी लक्षणे - करडे लटपटत चालतात, मागचे पाय धरत नाहीत, घशात खवखवते, पाय ताठरतात, कातडी राठ होते.
अावश्यकता - १०-१८ पीपीएम 
खाद्याचा स्रोत - कॉपर सल्फेट ०.५ टक्के, खनिजमिश्रण.

मॅंगेनीज
अभावामुळे दिसणारी लक्षणे - नीट चालता येत नाही, प्रजनन क्रिया बिघडते.
अावश्यकता - ०.१-३ पीपीएम 
खाद्याचा स्रोत - एकदल धान्ये

झिंक
अभावामुळे दिसणारी लक्षणे - पायाचे सांधे ताठरतात, लाळ गळते, पाय सुजतात, प्रजननाची कार्यक्षमता बिघडते, वाढ खुंटते, गर्भपात होतात. 
अावश्यकता - ४०-५०० पीपीएम 
खाद्याचा स्रोत - करडई बिया, तृणधान्ये, ग्लुटेनयुक्त खाद्य.

लोह (आयर्न) 
अभावामुळे दिसणारी लक्षणे - अशक्तपणा, भूक मंदावते, वाढ खुंटते, वयात लवकर येत नाही, रक्त कमी होते, ॲनिमिया होतो. 
अावश्यकता - ५०-१००० पीपीएम 
खाद्याचा स्रोत - हिरवा चारा, अंडी

आयोडीन  
अभावामुळे दिसणारी लक्षणे - गळा सुजतो, बौद्धिकवाढ कमी होते, निकृष्ट प्रजननअावश्यकता - ०.५-५० पीपीएम 
खाद्याचा स्रोत - मीठ, पोटॅश, आयोडाइड.

सेलेनियम 
अभावामुळे दिसणारी लक्षणे - माजावर न येणे, गाभण न राहणे.
अावश्यकता - ०.१ -३ पीपीएम 
खाद्याचा स्रोत - सेलेनियम आॅक्साइड.

महत्त्वाची जीवनसत्त्वे व त्याचे प्रमाण
जीवनसत्त्व  अ  

अभावामुळे दिसणारी लक्षणे - त्वचेचे रोग, रातांधळेपणा, डोळ्यांचे बुबुळ पांढरे होणे.
खाद्याचा स्रोत - गाजर व त्याचा पाला, मेथी घास, हिरवा चारा, सोयाबीन, मटकी.

जीवनसत्त्व ब, ब-१, ब-२, ब-५, ब-६, ब-१२ 
अभावामुळे दिसणारी लक्षणे -  वाढ खुंटणे, बेरीबेरी, अशक्तपणा,  ॲनिमिया. 
खाद्याचा स्रोत - मटकी, सोयाबीन, गव्हाचा भरडा, कडधान्य कोंडा, हिरवा मका, मेथी घास

जीवनसत्त्व क 
अभावामुळे दिसणारी लक्षणे - वाढ खुंटणे, अशक्तपणा, माजावर उशिरा येणे, स्कर्वी रोग.
खाद्याचा स्रोत - गाजर, हिरवी वैरण, टोमॅटो, चिंच, लिंबू, आंबट पदार्थ

जीवनसत्त्व ड 
अभावामुळे दिसणारी लक्षणे - हाडांचा ठिसूळपणा, मुडदूस रोग, मायांग बाहेर येणे. 
खाद्याचा स्रोत - कोवळे सूर्यकिरण, शेंगदाणे, सरकी पेंड

जीवनसत्त्व ई 
अभावामुळे दिसणारी लक्षणे - वाढ खुंटते, भाकड काळ वाढतो, वांझपणा, माज दाखवत नाहीत व गाभण राहत नाही. 
खाद्याचा स्रोत - ओली वैरण, कडधान्याचा कोंडा, मोड आलेले धान्य, जीवनसत्त्व ई. 

आहारातील विविध अन्नघटक
पाणी  

अावश्यकता - अन्न पचनासाठी, शरीरातील सर्व क्रिया व्यवस्थित होण्यासाठी 
स्रोत - हिरवा चारा, स्वच्छ पाणी

प्रथिने 
अावश्यकता - शारीरिक वाढ, प्रजनन व दूध उत्पादन, शरीराची झीज भरून काढण्यासाठी, रोगप्रतिकारासाठी 
स्रोत - द्विदल पिके, माशांचे कूट, तेल-बियांणांची पेंड

स्निग्धांश 
अावश्यकता - ऊर्जानिर्मिती, कातडीची चमक, सुलभ हालचाली, ऊर्जा साठवण, उष्णतारोधक, चरबीच्या स्वरूपात साठवला जातो.
स्रोत - विविध प्रकारच्या पेंड, मका, सोयाबीन, तांदळाचे उपपदार्थ, तेलयुक्त बिया

कर्बोदके
अावश्यकता - रवंथ क्रियेसाठी, उष्णतेचा पुरवठा, कोठीपोटातील एकपेशींसाठी, चरबी निर्मिती (अन्नाचे पचन होते), शरीराची वाढ, ऊर्जा मिळविण्यासाठी.
स्रोत - सर्व प्रकारचे गवत, कडबा, पाला, फांद्या, तृणधान्य, कडधान्य

क्षार व जीवनसत्त्व  
अावश्यकता - शरीरातील सर्व क्रियांसाठी, रोग प्रतिकारशक्तीसाठी, शरीरक्रियांचे संतुलन राखण्यासाठी, शरीरवाढ, उत्पादन व संरक्षण. 
स्रोत - हिरवा चारा, पेंडी, खुराक, क्षार विटा

तंतुमय पदार्थ
अावश्यकता - तंतुमय पदार्थांमुळे पचन चांगले होते, जनावरांचे पोट भरते, दुधातील फॅटचे प्रमाण वाढते.
स्रोत -  चारा व धान्याचा भुसा.

 - डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

Web Title: agro news Importance of the various components of goat's diet