धान्योत्पादन वाढीसाठी ‘अायसीएअार’चे महत्त्वपूर्ण योगदान - राधामोहनसिंह

वृत्तसंस्था
सोमवार, 17 जुलै 2017

नवी दिल्ली - देशातील धान्योत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (अायसीएअार) महत्त्वपूर्ण योगदान अाहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी रविवारी (ता. १६) येथे केले. ते `अायसीएअार’च्या ८९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. 

नवी दिल्ली - देशातील धान्योत्पादन वाढविण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (अायसीएअार) महत्त्वपूर्ण योगदान अाहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी रविवारी (ता. १६) येथे केले. ते `अायसीएअार’च्या ८९ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी कृषी राज्यमंत्री सुदर्शन भगत, अायसीएअारचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा उपस्थित होते. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या तीन संस्था, १२ कृषी विज्ञान केंद्रांना पुरस्कार देऊन गौरविण्यात अाले. तसेच विभागीय स्तरावरील सहा शेतकऱ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय कृषी पुरस्काराने गौरविण्यात अाले. तर ११ शेतकऱ्यांचा जगजीवनराम अभिनव किसान पुरस्काराने गौरव करण्यात अाला. 

यावेळी राष्ट्रीय कृषी उच्चशिक्षण प्रकल्पाचे उद्‍घाटन कृषिमंत्री सिंह यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणाले, की देशातील धान्योत्पादनात गेल्या काही दशकांत वर्षात पाच पटीने वाढ झाली अाहे. तर मत्स्य उत्पादन १४.३ पटीने, दूध उत्पादन ९.६ पटीने अाणि अंडी उत्पादन ४७.५ पटीने वाढले अाहे. तर फळे अाणि भाजीपाला उत्पादनात तीन पटीने वाढ झाली अाहे. अापल्या देशातील शास्त्रज्ञ विज्ञान अाणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांगली कामगिरी करत अाहेत. यामुळे त्यांची अांतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत अाहे, असे त्यांनी नमूद केले.  

महाराष्ट्राला ‘अायसीएअार’चे दोन पुरस्कार

मुंबई - परभणी जिल्ह्यातील मनवत तालुक्यातील मनोली येथील महिला प्रगतिशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे आणि पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वैयक्तिक गटात परभणी जिल्ह्यातील मनवत तालुक्यातील मनोली येथील महिला प्रगतिशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांना ‘जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार २०१६’ प्रदान करण्यात आला. श्रीमती शिंदे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी प्रयोग करून सोयाबीन, कपाशी आणि ज्वारी पिकांचे विक्रमी उत्पादन घेतले. शिंदे यांनी पाण्याची प्रभावीपणे साठवण करून जलसंधारण क्षेत्रातही उल्लेखनीय काम केले आहे, त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विभाग-८ मधून राज्यातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कृषी विज्ञान केंद्राला कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी ‘पं. दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कृषी विज्ञान पुरस्कार २०१६-१७’ने सन्मानित करण्यात आले. गोखले शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. सर एम.एस. गोसावी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संभाजीराव नालकर आणि शास्त्रज्ञ विलास जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन्मान पत्र आणि २.२५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Web Title: agro news Important contribution of icar for the growth of grain production