आंतरमशागतीचा वेग वाढवेल सुधारित बैलचलित कोळपे

डॉ. दत्तप्रसाद वासकर, प्रा. एस. एन. सोलंकी 
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पिकांच्या चांगल्या वाढीसाठी तण नियंत्रण आणि आंतरमशागत अत्यंत आवश्यक असते. यासाठी बैलचलित सुधारित यंत्राचा वापर केल्यास श्रम आणि वेळेमध्ये बचत करता येते.

पिकांचे उत्पादन घटण्यामध्ये तणांचा प्रादुर्भाव हे एक कारण असते. तण नियंत्रणासाठी परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठामध्ये ‘पशू शक्तीचा योग्य वापर’ या प्रकल्पांतर्गत सुधारित अवजारांची निर्मिती केली आहे. सामान्यतः मजुरांच्या साह्याने एक हेक्‍टर खुरपणी करण्यासाठी १०० ते १५० तास लागतात, तर बैलचलित एका जू वर दोन किंवा तीन कोळपे लावल्यास एक हेक्‍टर क्षेत्र साधारणतः १८ ते २४ तासामध्ये पूर्ण होते. 

बैलचलित तीन पासेचे कोळपे -

बैलचलित तीन पासेचे खत कोळप्याद्वारे एक मजूर तीन ओळीतील आंतरमशागत आणि खत देण्याचे काम एकाच वेळी करू शकतो. 

या अवजाराची लांबी १७० सें.मी. व उंची ३० ते ४५ सें.मी. आहे. त्यावर २२.५ सें.मी. आणि ३० सें.मी. रुंदीच्या तीन पास बसविता येतात. त्यामुळे खत पेरणी आणि आंतरमशागतीचा वेळ वाचतो. 

 एका दिवसात २.५ ते ३ एकर क्षेत्राची कोळपणी व खत देण्याचे काम करता येते.

- प्रा. एस. एन. सोलंकी, ८००७७५२५२६
(संशोधन अभियंता, अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प, पशयोवा, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.)

Web Title: agro news Increased intermittent acceleration improved bolt coalition

टॅग्स