संवर्धन मरळ माशांचे...

संवर्धन मरळ माशांचे...

मरळ हे चविष्ट मासे आहेत. या माशांच्या व्यावसायिक संवर्धनाला चांगली संधी आहे. मरळ माशाची बोटुकली स्थानिक संवर्धन केंद्र किंवा सरकारी मत्स्यव्यवसाय विक्री केंद्रातून खरेदी करावी.
 

मरळ माशांचे संवर्धन तैवान, फिलिपिन्स आणि थायलंडमध्ये केले जाते. भारतात मुख्यतः आंध्र प्रदेशमध्ये या माशांचे संवर्धन मोठ्या प्रमाणात केले जाते. मरळ माशाचे प्रामुख्याने जायंट मरळ, स्ट्रिप्ड मरळ, स्पॉटेड मरळ आणि चिखलातील मरळ (मड मरळ) हे प्रकार आहेत.

जागेची निवड -
    जमीन सपाटीपासून उंचावर असावी. चांगली गुणवत्ता असलेल्या पाण्याचा पुरवठा असावा.

तलावाचे बांधकाम -
    वाढीच्या टप्यात मासे मोठ्या प्रमाणात साठविता येत नाहीत. याची साठवणूक त्यांच्या आकारावर अवलंबून असते.
    पाणी साठवण आणि मरळ मासे त्यात ठेवण्याकरिता तलावाला मातीचे बांध घालावेत. या बांधाची उंची त्या जागेच्या किंवा जमिनीच्या भौगोलिक परिस्थितीवर अवलंबून असते.
    पाणी बाहेर जाण्याकरिता आउटलेट असणे गरजेचे आहे. त्याच्या विरुद्ध बाजूस झडप ठेवावी.

संवर्धनासाठी बीजसंकलन -
    व्यावसायिक मरळ संवर्धन आपल्याकडे फारसे केले जात नाही. मरळ माशाची बोटुकली नद्या, जलाशय, बारमाही टाक्‍या आणि इतर जलाशयांमध्ये उपलब्ध असते. 
    माशाचे बीज ऑगस्ट ते मे महिन्यात जलाशयामध्ये उपलब्ध असते.

बीजसाठवण - 
    या माशामध्ये श्‍वसनासाठी वेगळा अवयव असल्याने मत्स्यबीज अवस्थेमध्ये हे मासे जास्त प्रमाणात साठवता येऊ शकतात. 
    मरळ बोटुकली साठवण्याचा सरासरी दर प्रतिहेक्‍टरी २०,००० ते २५,००० असा आहे. 
    कोळी लोक नैसर्गिक स्रोतांपासून मरळ माशाच्या बोटुकली गोळा करतात. हे मासे संवर्धन करणाऱ्यांना विकतात. 
    मरळ माशाची बोटुकली स्थानिक संवर्धन केंद्र किंवा सरकारी मत्स्यव्यवसाय विक्री केंद्रातून खरेदी कराव्यात.

मत्स्यसंवर्धनासाठी पाणीपुरवठा -
    मत्स्यसंवर्धन करताना मुख्य तलावाच्या बरोबरीने अतिरिक्त पाण्याचा पुरेसा पुरवठा करणारा कालवा असावा. 
    या कालव्याला दरवाजा असावे. मात्र ते लाकडी झडपेपासून ३० सें.मी. उंचीच्या वर नसावे. तलावाला दुसरा दरवाजा हा तलावातील पाणी बाहेर काढण्यासाठी असावा.
    पाण्याचा योग्य प्रवाह तयार करण्यासाठी एक लाकडी दरवाजा तलावाच्या बाहेरील बाजूस आणि एक आतील बाजूस असावा.

पाण्याच्या तापमानाचे नियंत्रण -
    माशाच्या योग्य वाढीसाठी आणि खाद्य परिवर्तनाचा दर (FCR) वाढवण्यासाठी तलावातील पाण्याचे तापमान नियंत्रणात ठेवावे.

मरळसंवर्धन तलावांची काढणी -
    जेव्हा मासे ५०० ग्रॅम वजनाचे होतात तेव्हा संवर्धन तलावातून जाळे वापरून मासे काढतात. परंतु, मड मरळ मासे साधारपणतः लहान असताना काढले जातात.

फायदे -
ओमेगा ३ फॅटिॲसिड आणि प्रथिने यांचा चांगला स्त्रोत.
त्वचा आणि केस यांची गुणवत्ता चांगली होते. दृष्टी चांगली होते.
माशांच्या सेवनाने उदासिनता कमी होण्यास मदत होते.

- डॉ. गौरी शेलार - ७६६६०९६७८९ (लेखिका मत्स्यशास्त्र अभ्यासक आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com