ओळखा दुधातील भेसळ...

अजय गवळी, वैष्णवी निर्मळ  
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

भेसळयुक्त दुधामुळे आरोग्यास धोका निर्माण होतो. भेसळयुक्त दूध फक्त नजरेने, वासाने किंवा चवीने ओळखू शकत नाही. त्यासाठी काही रासायनिक चाचण्या करता येतात. या चाचण्या खर्चिक आहे. तसेच या चाचण्या प्रयोगशाळेतच कराव्या लागतात. भेसळ तंत्र हे सतत बदलत असते. त्यामुळे त्या अनुरूप चाचण्या करणे गरजेचे आहे.

दुधातील पाण्याची भेसळ ओळखणे 
 लेक्टोमीटरच्या साह्याने दुधात पाणी मिसळलेले आहे की नाही हे आपणास समजू शकते. पण कायदेशीर हे सिद्ध करणे शक्य होत नाही. त्यासाठी फ्रीझिंग पॉइंट टेस्ट आहे. परंतु यासाठी वेळ जास्त लागतो. याची प्रक्रिया खर्चिक आहे. 

दुधात साखरेची भेसळ ओळखणे 
 साखरयुक्त दूध ओळखण्यासाठी चाचणी केली जाते. या चाचणीसाठी १० मि.लि. दुधाचा नमुना परीक्षा नळीत घ्यावा. त्यात ५ मिलि संपृक्त हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळावे.
 त्याच प्रमाणे ०.१ ग्रॅम रिसॉरसिनील पावडर मिसळून चांगले हलवून नळी 
गरम पाण्यात ठेवावी. जर दुधाला तांबडा 
रंग आला तर दुधात साखर आहे असे समजावे.

दुधातील मैद्याची भेसळ ओळखणे 
 परीक्षा नळीत ३ मिलि दूध घ्यावे. त्यात दोन ते तीन थेंब एक टक्का आयोडीनचे द्रावण मिसळावे. मिश्रण कोमट पाण्यात ठेवावे.
 मिश्रणाला निळा रंग आल्यास त्या दुधात स्टार्च/मैद्याची भेसळ आहे असे समजावे. 

दुधातील मिठाची भेसळ ओळखणे 
 परीक्षा नळीत १ मिलि दुधाचा नमुना घ्यावा. त्यात ०.८ टक्के सिल्व्हर नायट्रेट ५ मिलि आणि एक टक्का पोटॅशियम क्रोमेट द्रावणाचे २ ते ३ थेंब मिसळावे.
 मिश्रण पिवळे झाले तर दुधात मिठाची भेसळ समजावी.

दुधात सोड्याची भेसळ ओळखणे 
 यासाठी रोझालिक टेस्ट करतात. दुधाचा जो नमुना तपासायचा असेल त्यातील ५ मिलि दूध परीक्षा नळीत घ्यावे. त्यात ५ मिलि अल्कोहोल मिसळावे.
 एक टक्का क्षमतेचे रोझालिक असिडचे चार ते पाच थेंब अल्कोहोल मिसळलेल्या द्रावणात टाकावेत.
 जर दुधाचा रंग लालसर झाला, तर त्या दुधात सोडा मिसळलेला आहे असे समजावे.

दुधातील युरियाची भेसळ ओळखणे 
 परीक्षा नळीत ५ मिलि दुधाचा नमुना घ्यावा. त्यात ५ मिलि म्हणजेच १६ टक्के पॅरोडायमिथाईल ॲमिनो बीनाल्डीहाइडचे द्रावण मिसळावा.
 मिश्रणाला गडद पिवळा रंग आल्यास दुधात युरियाची भेसळ आहे असे समजावे.

दुधात साबणाचा चुरा मिसळल्याचे ओळखणे  
 परीक्षा नळीत १० मिलि दुधाचा नमुना घ्यावा. त्यात १० मिलि गरम पाणी मिसळून हलवावे. पुढे त्यात १-२ थेंब फिनॉलप्थॅलिनचे द्रावण मिसळून हलवावे.
 जर दुधाला निळा रंग आला तर त्या साबणाचा चुरा मिसळल्याचे समजावे.
दुधात स्कीम मिल्क पावडर मिसळल्याचे ओळखणे 
 परीक्षा नळीत थोडा दुधाचा नमुना घ्या. त्यात तीव्र नायट्रिक आम्ल मिसळावे. 
 मिश्रणाला जर केशरी/नारंगी रंग आल्यास दुधात स्कीम मिल्क पावडर असल्याचे समजते.
 मिश्रणाला जर पिवळा रंग आला, तर दुधात स्कीम मिल्क पावडर नसल्याचे समजावे. 

- अजय गवळी ः ८००७४४१७०२ (के. के. वाघ कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, नाशिक)

Web Title: agro news milk mixing identify