तेलंगणा, कर्नाटकात मूग खरेदीस प्रारंभ

तेलंगणा, कर्नाटकात मूग खरेदीस प्रारंभ

बाजारातील नव्या अावकेस ४,५०० ते ४,६०० दर; जुन्या मुगाला मात्र ४,९५० रूपये 

नवी दिल्ली - खरिपातील नवीन मूग पिकाची तेलंगणा आणि कर्नाटकामधील बाजार समित्यांमध्ये आवक सुरू झाली आहे. मात्र सध्या मुगाचे दर हमीभावापेक्षा कमी आहेत. या पार्श्वभूमीवर बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून आणल्या जाणाऱ्या मुगाला चांगला दर मिळावा, या उद्देशाने राष्ट्रीय कृषी सहकारी मार्केटिंग फेडरेशनने (नाफेड) मुगाची हमीभावात खरेदी सुरू केली अाहे, असे नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चढ्ढा यांनी सांगितले.

रब्बी परिषदेच्या निमित्ताने त्यांनी ही माहिती दिली अाहे. 
दरम्यान, कर्नाटकातील कलबुर्गी येथे दोन दिवसांपूर्वी अावक झालेल्या मुगाला प्रतिक्विंटल ४,५००-४,६०० रुपये दर मिळाला अाहे. तर जुन्या मुगाचा दर प्रतिक्विंटल ४,९५० रुपये अाहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.
मुगाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रतिक्विंटल ५,५७५ रुपये निश्‍चित केली आहे. मात्र, नवीन मुगाला एमएसपीपेक्षा कमी दर मिळाला आहे.

बफर स्टॉक करण्याच्या उद्देशाने नाफेडकडून कडधान्यांचा बफर स्टॉक केला जातो. त्यानुसार नाफेडने खरीप हंगामातील कडधान्यांची खरेदी करण्यास सुरवात केली अाहे. तेलंगणा, कर्नाटकामधील बाजार समित्यांमध्ये मुगाची अावक सुरू झाली अाहे. मात्र दरावर त्याचा परिणाम होत अाहे. या पार्श्वभूमीवर नाफेडने मूग खरेदी सुरू केल्याचे श्री. चढ्ढा यांनी सांगितले. 
मुगाची खरेदी नुकतीच सुरवात केली अाहे. पुढील दहा दिवसांत अन्य राज्यांतील बाजार समित्यांमध्ये मुगाची अावक होण्यास सुरवात होईल. राज्य सरकारकडून अालेल्या प्रस्तावानुसार त्या-त्या राज्यांत मूग खरेदी सुरू केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

भुईमूग खरेदीसाठी गुजरातकडून सूचना
भुईमुगाची खरेदी करण्यासाठी गुजरात सरकारकडे विनंती केली अाहे. यंदा गुजरातमध्ये भुईमुगाचे बंपर उत्पादन मिळण्याची शक्यता अाहे. या पार्श्वभूमीवर नाफेडने भुईमूग खरेदीची तयारी सुरू केली अाहे. तेलबिया उत्पादनात गुजरात राज्य अाघाडीवर अाहे. यंदा (२०१७-१८) खरीप हंगामात गुजरातमध्ये ३.२६ दशलक्ष टन भुईमूग उत्पादन मिळण्याचा अंदाज अाहे. गेल्या वर्षी २.७४ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.   

खरिपातील मुगाची कर्नाटक, तेलंगणमध्ये अावक सुरू झाली अाहे. मात्र सध्या मुगाचे दर कमी अाहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून अाणल्या जाणाऱ्या मुगाला चांगला दर मिळावा, या उद्देशाने नाफेडने मुगाची हमीभावात खरेदी सुरू केली अाहे. 
- संजीव कुमार चढ्ढा, व्यवस्थापकीय संचालक, नाफेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com