अमेरिकेला भासतेय मत्स्यपालनाकडे लक्ष देण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

अमेरिकेतील मत्स्याहाराची मागणी पुरवण्यासाठी अधिक मत्स्यपालनातील संशोधनाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असल्याची माहिती बेल्ट्सव्हिले (मेरीलॅंड) येथील कृषी संशोधन सेवेच्या अॅक्वाकल्चर प्रकल्प अधिकारी कॅअर्ड रेक्सरोड यांनी दिली आहे. सध्या केवळ १० टक्के देशांतर्गत उत्पादन असून, एकूण मागणीच्या ९० टक्क्यापर्यंत आयात करावी लागते. 

अमेरिकेतील मत्स्याहाराची मागणी पुरवण्यासाठी अधिक मत्स्यपालनातील संशोधनाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत असल्याची माहिती बेल्ट्सव्हिले (मेरीलॅंड) येथील कृषी संशोधन सेवेच्या अॅक्वाकल्चर प्रकल्प अधिकारी कॅअर्ड रेक्सरोड यांनी दिली आहे. सध्या केवळ १० टक्के देशांतर्गत उत्पादन असून, एकूण मागणीच्या ९० टक्क्यापर्यंत आयात करावी लागते. 

 मत्स्याहार हा अन्य मांसाहाराच्या तुलनेमध्ये अधिक आरोग्यदायी मानला जातो. सागरी मासेमारीसोबतच जमिनीवरील तलावामध्ये उत्तम प्रतीच्या माशांच्या उत्पादनासाठी अमेरिकी कृषी संशोधन सेवा येथील संशोधक संशोधन करीत आहेत. त्यामध्ये माशांची पैदास, व्यवस्थापन आणि काढणी  या बरोबर शेलफिश आणि पान वनस्पतीं या अत्यंत महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. 

अमेरिकेतील अॅक्वापोनिक्स उद्योगामध्ये सागरी आणि गोड्या पाण्यातील उत्पादन घेतले जात असून, त्यांचा जगभरामध्ये १६ वा क्रमांक लागतो. त्याचे मूल्य प्रतिवर्ष १.४ अब्ज डॉलरपर्यंत जाते. २०१४ च्या अहवालानुसार अमेरिकी ग्राहकांकडून मत्स्याहारासाठी सुमारे ९१.७ अब्ज डॉलर खर्च केले गेले. थोडक्यात, ९० टक्क्यापर्यंत मासे हे आयात करावे लागतात. प्रतिवर्ष मागणीमध्ये वाढ होत असताना सागरी उत्पादनाचे प्रमाण १९८० पासून एका स्थिर तळीवर आहे. नुकत्याच अमेरिकनांसाठी प्रकाशित झालेल्या आहारविषयक निकषांमध्ये सागरी उत्पादनांचे आहारातील प्रमाण प्रतिआठवडा ४.८ आऊन्स (१३६ ग्रॅम) ऐवजी ८ आऊन्स (२२७ ग्रॅम) पर्यंत वाढवण्याची सूचना आहे. या वाढीनुसार मागणीमध्ये आणखी वाढ अपेक्षित असल्याने अमेरिकेतील मत्स्यउत्पादन वाढविण्यासोबतच त्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी संशोधक प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी व्यावसायिक उत्पादकांचीही मदत घेतली जात आहे. संशोधनामध्ये जनुकीय तंत्रज्ञान, पारंपरिक पैदास तंत्र, औषधे अशा अनेक घटकांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे बेल्ट्सव्हिले (मेरीलॅंड) येथील कृषी संशोधन सेवेच्या अॅक्वाकल्चर प्रकल्प अधिकारी कॅअर्ड रेक्सरोड यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news The need to pay attention to the predominantly American fisheries