तेलबिया प्रक्रिया उद्योगात आहेत संधी

तेलबिया प्रक्रिया उद्योगात आहेत संधी

खाद्यतेलाच्या गरजा भागवण्यासाठी तेलबिया प्रक्रिया उद्योग ग्रामीण तसेच शहरी भागात सुरू झाले आहेत. काही भागात मोठ्या प्रमाणावर तेल काढण्यासाठी सॉल्व्हंट प्लांटची सुरवात झाली. अशाप्रकारे काढलेले तेल रसायनांच्या मदतीने शुद्ध करून बाजारात उपलब्ध केले जाऊ लागले. अलीकडे तेलघाणीतील तेलाचा वापर पुन्हा वाढला आहे. त्यामुळे तेलबिया प्रक्रियाचा कुटीर ते मध्यम स्तरीय उद्योग ही एक चांगली संधी तयार झाली आहे. २०१६-१७ या वर्षात देशामध्ये तेलबियांचे उत्पादन २३२.८ लाख मेट्रिक टन अनुमानित आहे. 

याचबरोबरीने जवस, कारळे, सरकी, खोबरे तसेच भाताच्या कोंड्याच्या तेलाचा समावेश होतो. यापासून ६९.६० लाख टन खाद्यतेल मिळते. खाद्यतेलाची बाकीची गरज पूर्ण करण्यासाठी आपण ते आयात करतो. तेलबियापासून तेल काढणे एवढाच एक तेलबिया प्रक्रिया उद्योग नसतो. बऱ्याचदा उद्योग म्हणजे मोठी जागा, त्यावर उभा केलेला कारखाना, त्यामध्ये काम करणारे मजूर इ. असे चित्र डोळ्यासमोर उभे रहाते. परंतु, आता वेगवेगळे उद्योग उभे राहात आहेत. 

काही तेलबिया आपण पूर्ण दाण्याच्या रूपात खाद्योपयोग करतो. शेंगदाणे, सोयाबीन, जवस, सूर्यफूल, तीळ इ. मात्र उपयोग करण्यासाठी प्रत्येक तेलबियांवर वेगवेगळी प्रक्रिया करणे आवश्‍यक असते. अशा प्रकारचा प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासाठी जास्त जागा अथवा भांडवल लागत नाही.

- डॉ. एस. डी. कुलकर्णी ९७५२२७५३०४ (लेखक केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ येथे कार्यरत होते)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com