कांदा दर डोळ्यांत खुपू लागला - रामविलास पासवान

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - देशभरात कांदा दरात सुधारणा होत असतानाच केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या डोळ्यांत तो खुपू लागल्याचे दिसते.

देशांतर्गत बाजारात कांद्याचा पुरवठा वाढविण्यासाठी कांद्याचे किमान निर्यातमूल्य (एमईपी) प्रतिटन ४५० डॉलर निश्चित करण्याचा प्रस्ताव केंद्रीय अन्नमंत्री रामविलास पासवान यांनी वाणिज्य मंत्रालयापुढे ठेवला अाहे. तसेच त्यांना कांदा निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना दिल्या जात असलेल्या सवलती मागे घेण्याची विचारणादेखील केली अाहे. केंद्रीय अन्नमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे कांदा उत्पादक शेतकरी संतप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कांद्याचे निर्यातमूल्य २०१५ मध्ये काढून टाकण्यात अाले होते. अाता कांद्याचे दर वाढल्याचे कारण देत निर्यातमूल्य पुन्हा लागू करण्याची विचारणा वाणिज्य मंत्रालयाला करण्यात अाली अाहे. याचा फटका देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता अाहे. 

एेन पावसाळ्यात कांद्याची अावक कमी होत अाहे. यामुळे देशातील प्रमुख बाजारांत कांद्याचे भाव प्रतिकिलो ५० रुपयांवर पोचले अाहेत. या पार्श्वभूमीवर भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात अाहेत.
कांद्याचे भाव वाढण्यामागे केंद्रीय अन्नमंत्री पासवान यांनी कांदा साठेबाजांना जबाबदार धरले अाहे. ‘‘बाजारात कांदा पुरेशा प्रमाणात उपलब्ध अाहे. मात्र मध्यस्थ अाणि साठेबाजांमुळे कांद्याच्या दरात वाढ झाली,’’ असा दावा श्री. पासवान यांनी ट्विटरद्वारे केला अाहे. साठेबाजी अाणि काळा बाजार करण्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी राज्य सरकारना दिले अाहेत.

गेल्या वर्षी ३५ लाख टन निर्यात
गेल्या वर्षी देशातून ३४.९२ लाख टन कांद्याची निर्यात झाली होती. गेल्या वर्षी (२०१६-१७) कांद्याचे उत्पादन २१५ लाख टन झाले होते. तर त्याअाधीच्या वर्षी २०९ लाख टन कांदा उत्पादन झाले होते. सध्या २०१६-१७ वर्षात पिकविलेल्या कांद्याचा वापर केला जात अाहे. एकीकडे कडधान्ये, तेलबियांचे दर हमीभावापेक्षा खाली घसरले अाहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले अाहे. अाता कुठे शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत अाहे. मात्र ही भाववाढ रोखण्यासाठी केंद्राकडून अाटापिटा केला जात अाहे. दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामातील नवीन कांद्याची पुढील महिन्यापासून अावक सुरू होण्याची शक्यता अाहे. 

सध्या बाजारात पुरेसा कांदा उपलब्ध अाहे. मात्र साठेबाज अाणि मध्यस्थांमुळे कांद्याचे दर वाढले अाहेत.
- रामविलास पासवान, केंद्रीय अन्नमंत्री

Web Title: agro news onion rate increase