जुलैमध्ये १०१ टक्के, ऑगस्टमध्ये ९४ टक्के पाऊस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (माॅन्सून) हंगामात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने बुधवारी (ता. ३०) जाहीर केला, तर मॉन्सून मिशन मॉडेलनुसार देशात १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात १०१ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९४ टक्के पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यात ९ टक्क्यांची कमी/अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मध्य विभागात ९९ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

पुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याच्या (माॅन्सून) हंगामात सर्वसाधारण म्हणजेच सरासरीच्या ९७ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने बुधवारी (ता. ३०) जाहीर केला, तर मॉन्सून मिशन मॉडेलनुसार देशात १०२ टक्के पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्यात १०१ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९४ टक्के पाऊस पडेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे. यात ९ टक्क्यांची कमी/अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. महाराष्ट्रासह मध्य विभागात ९९ टक्के पावसाचा अंदाज आहे. 

हवामान विभागाने १६ एप्रिलला मॉन्सून हंगामाचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला होता. त्यानंतर बुधवारी सुधारित अंदाज जाहीर करण्यात आला. संपूर्ण हंगामात पडणारा पाऊस, जुलै, ऑगस्टमधील सरासरी पाऊस, तसेच चार भौगोलिक विभागांमध्ये पडणाऱ्या पावसाचा अंदाज देण्यात आला. सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण पाऊस मानला जातो. १९५१ ते २००० या कालाधीतील देशातील पावसाची सरासरी ८९० मिलिमीटर आहे. स्टॅटेस्टिकल एन्सेंबल फोरकास्टिंग सिस्टिम (एसइएफएस) मॉडेलनुसार देशात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ९७ टक्के पाऊस, तर मॉन्सून मिशन कपल्ड फोरकास्ट सिस्टिम (एमएमसीएफएस) या मॉडेलनुसार १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यात चार टक्क्यांची तफावत गृहीत धरण्यात आली आहे. 

गतवर्षीच्या अखेरच्या टप्प्यात प्रशांत महासागरात विषूववृत्तीय भागात सुमद्राचे तापमान कमी झाल्याने मध्यम ‘ला-निना’ स्थिती निर्माण झाली होती. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक माॅडेलच्या अभ्यासानुसार यंदाच्या मॉन्सून काळात प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानाची स्थिती सर्वसाधारण राहणार आहे. त्यानंतर या वर्षाच्या अखेरच्या टप्प्यात या भागात तापमान वाढून ‘सौम्य एल-निनो’ स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील पाण्याचे तापमान वाढलेले अाहे. इंडियन ओशन डायपोलची (आयओडी) स्थिती सर्वसाधारण असून, मॉन्सूनच्या मध्यात ती नकारात्मक पातळीवर जाण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

 हवामान विभागाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर
 मॉन्सून सरासरी गाठणार; देशात ९७ टक्के पाऊस
 महाराष्ट्रासह मध्य विभागात ९९ टक्के पर्जन्यमान

सरासरीइतक्या पावसाची शक्यता अधिक
हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार यंदा सरासरी इतका पाऊस (९६ ते १०४ टक्के) पडण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे ४३ टक्के आहे. मॉन्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी (९० ते ९६ टक्के) पावसाची शक्यता २८ टक्के, सरासरीपेक्षा अपुऱ्या (९० टक्क्यांपेक्षा कमी) पावसाची १३ टक्के, सरासरीपेक्षा अधिक (१०४ ते ११० टक्के) पावसाची शक्यता १३ टक्के, तर सरासरीपेक्षा जास्त (११० टक्क्यांपेक्षा अधिक) पावसाची शक्यता अवघी ३ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 

चार भौगोलिक हवामान विभागाचा अंदाज
 वायव्य विभाग : १०० टक्के
 मध्य विभाग : ९९ टक्के
 दक्षिण विभाग : ९५ टक्के 
 ईशान्य विभाग : ९३ टक्के 

Web Title: agro news rain