सोलर टनेल ड्रायर फायदेशीर

सोलर टनेल ड्रायर फायदेशीर

सोलर टनेल ड्रायर हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. सोलर टनेल ड्रायरमध्ये फळे, भाजीपाला, मसाले वाळवता येतात.

आपल्या देशात  फक्त २ ते ३ टक्के कृषी उत्पादन हे प्रक्रिया करून वापरले जाते.  वाळवणी तंत्रामुळे शेतमालाचे नुकसान २ ते ३ टक्यांनी कमी होऊ शकते. टिकवणक्षमता वाढविण्यासाठी राहण्यासाठी दर्जेदार वस्तू शेतमाल एकसारख्या प्रमाणात वाळवणे आवश्यक आहे. वाळवणीसाठी खनिज इंधनाचा वापर न करता अपारंपरिक उर्जा वापरल्यामुळे वातावरण दुषित होणार नाही. शेतमाल योग्य पद्धतीने वाळवल्यामुळे कृषी उत्पादनाची किंमतही वाढते. आपल्याकडे असलेला मुबलक सूर्यप्रकाशाचा वापर वाळवणी प्रक्रियेसाठी करणे आवश्यक आहे. 

सोलर टनेल ड्रायर 
    वाळवलेल्या पदार्थाला जगभरात चांगली मागणी आहे. वाळवलेले पदार्थ हे ताज्या पदार्थासाठी एक उत्तम पर्याय आहे. हे तंत्रज्ञान प्रदूषण न करणारे आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. फळे आणि पालेभाज्या वाळवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे.
    खुल्या सूर्यप्रकाशात फळांचे काप किंवा भाजीपाला वाळवल्यामुळे बऱ्याचदा नुकसान होते, कारण यामध्ये धूळ, पाऊस तसेच प्राणी, कीटक आणि पक्षांपासून नुकसान संभावते. उत्पादनाची गुणवत्ता खालावते. हे टाळण्यासाठी  सोलर टनेल ड्रायरचा वापर फायदेशीर ठरतो. 
    सोलर टनेल ड्रायरमध्ये फळे, भाजीपाला, मसाले वाळवता येतात. हा ड्रायर वापरण्यास आणि देखरेखीसाठी सोपा आहे. वेळेची बचत होते, दर्जा कायम राखला जातो. 
    १८ मी. × ३.७५ मी. आकाराच्या सोलर टनेल ड्रायर साठी साधारण १ लाख २० हजार एवढा खर्च येऊ शकतो. 
    टनेल ड्रायरची औष्णिक कार्यक्षमता १८ टक्यांपर्यत असते.

तापमान नियंत्रण उपाय
    ड्रायरमध्ये नियंत्रण प्रणाली ही दिवसा सूर्यप्रकाशाने वाळवण्यासाठी आणि रात्रीला जैवभार आधारित गरम हवा निर्माण करणाऱ्या उपकरणाच्या वापरासाठी नियंत्रित करणे गरजेचे आहे.
    प्रत्येक कृषी पदार्थासाठी वेगळे तापमान आणि आर्द्रतेची आवश्यकता असते.
    वाळवण्याचे नियमन विविध उपकरणाच्या सहाय्याने केले जाते.
    नियंत्रित स्थितीचे नियमन आवश्यक आहे 

तंत्रज्ञानाची वैशिष्ट्ये
    वाळवण्यासाठी सौर उष्णतेचा वापर .
    सोपे निर्मिती तंत्र.
    सोलर टनेल ड्रायर मध्ये ०.५ ते १.५ टन उत्पादन वाळवण्यासाठी १८ मी.×३.७५ मी × २ मी एवढी जागा आवश्यक.
    टनेलचा आकार अर्धगोलाकार असून यामध्ये हूपचाही वापर केला आहे.
    सूर्यकिरणे शोषणारा घटक हा २०० मिमी जाडीचा असून यु.व्ही. स्टॅबिलाईजड पॉलीथिलीनपासून बनवलेला असतो.
    ड्रायरचा तळभाग सिमेंट कॉंक्रीटपासून बनवलेला असतो. त्यावर काळ्या रंगाचे आच्छादन असते.
    व्हेंटिलेशनसाठी समान अंतरावर चिमणी बसवलेली असते.
    सोलर टनेल ड्रायर मधील तापमान हे बाहेरील तापमानापेक्षा २० ते २५ अंश सेल्सिअस अधिक असते.
    ड्रायरच्या वापरामुळे ५० टक्के वेळेची बचत होते.
    पारंपारिक पद्धतीपेक्षा या पद्धतीत ४० टक्के कमी श्रम लागतात.

- डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (कृषी अभियांत्रिकी विभाग,महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com