सोलर वॅक्स मेल्टर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

मेणबत्ती अणि काड्यापेटीनिर्मिती उद्योगात मेण प्रामुख्याने वापरले जाते. हे मेण पुढील प्रक्रियेसाठी आधी वितळविले जाते. यासाठी सौरऊर्जेचा वापर चांगला पर्याय आहे. सौरऊर्जेमुळे उष्णता मिळवण्यासाठी करावा लागणारा तेल आणि लाकडाचा वापर टाळता येऊ शकतो.

असा आहे सोलर वॅक्स मेल्टर
मेल्टिंग पॉइंट - ६२.८ अंश सेल्सिअस

विशिष्ट उष्णता 
घन - २५ अंश सेल्सिअस - २.०९ किलो ज्युल प्रतिकिलो अंश सेल्सिअस
द्रव - ६५ अंश सेल्सिअस - २.३ किलो ज्युल प्रतिकिलो अंश सेल्सिअस
घनता  
घन - २५ अंश सेल्सिअस - ८१६ किलो प्रतिघन मीटर
द्रव - ६५ अंश ः सेल्सिअस - ७८१ किलो प्रतिघन मीटर

कार्यपद्धती 
सोलर वॅक्स मेल्टरमध्ये सोलर फ्लॅट प्लेट कलेक्टर पाण्याच्या टाकीला जोडलेले असते. ही पाण्याची टाकी मेणाच्या चेंबर लगत असते. सौरऊर्जेमुळे तापलेले पाणी टाकीमध्ये येते. तेथे गरम पाण्याची उष्णता मेणाला दिली जाते. यामुळे मेण वितळते.

यंत्राचा आकार आपल्या गरजेनुसार कमी किंवा अधिक करता येऊ शकतो. निर्मिती करण्यासाठी टाकाऊ घटकांचा वापर करता येतो.  

लाकूड, लोखंड, अल्युमिनिअम पत्र्यापासून तयार केलेले हे यंत्र काळ्या रंगाने रंगवले जाते. त्यामुळे अधिक तापमान वाढवायला मदत होते.   

- डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

Web Title: agro news solar wax melter