तंत्र भस्मीकरणाचे...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थांचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे.

भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थांचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे.

भस्मीकरण ही एक रासायनिक प्रक्रिया अाहे. यात कार्बन, हायड्रोजन आणि टाकाऊ पदार्थातील इतर घटक ज्वलन प्रक्रियेतील ऑक्सिजनमध्ये मिसळून त्यापासून उष्णता निर्माण होते. प्रती टन घन टाकाऊ पदार्थाच्या पूर्ण  ज्वलनासाठी सर्व साधारणपणे ५००० किलो हवेची आवश्यकता असते. बऱ्याचदा यापेक्षा जास्त हवेचा पुरवठासुद्धा केला जातो. जास्त हवेचा पुरवठा केल्याने ज्वलनासाठी लागणारे पूर्ण मिश्रण व्हायला मदत होते, तसेच तापमान आणि उत्सर्जके नियंत्रित केले जाऊ शकतात. ज्वलनातून निर्माण होणारे वायू म्हणजे कार्बनडाय आॅक्साईड, कार्बन मोनोक्साइड, पाणी, ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे आॅक्साईड असतात.

भस्मीकरण उपकरण ९०० ते ११०० अंश सेल्सिअस तापमानात कार्य करण्यासाठी तयार केलेले अाहे. टाकाऊ पदार्थाचे पूर्ण ज्वलन करणे आणि कमीत कमी उत्सर्जके तयार होणे हा या प्रक्रियेचा प्रमुख उद्देश अाहे.

भस्मीकरण प्रक्रियेचे उद्देश 
    आकारमान कमी करणे
    टाकाऊ पदार्थांचे स्थिरीकरण करणे
    टाकाऊ पदार्थांपासून ऊर्जा मिळवणे
    टाकाऊ पदार्थांचे स्टरीलायझेशन करणे

भस्मीकरणाचे तंत्रज्ञान 
    मास बर्निंग सिस्टिम
    रेफ्युज डीऱ्हाईड फ्युएल सिस्टिम
    मोड्यूलर इन्सीरेशन
    फ्लुईडाईज्ड बेड इन्सीनरेशन

भस्मीकरणाचे फायदे 
    टाकाऊ पदार्थाचे वजन, आकारमान कमी होते.
    टाकाऊपासून ऊर्जानिर्मिती होते.
    रोजगार निर्मिती.
    टाकाऊ पदार्थांची उचित विल्हेवाट.
    लघू उद्योगाची संधी.

भस्मीकरण प्रक्रियेतून मिळणाऱ्या ऊर्जा 
    वीज निर्मिती
    वाफ निर्मिती
    को-जनरेशन (सहवीज निर्मिती)

भस्मीकरण प्रक्रियेतून निर्माण होणारी वायू उत्सर्जके 
    कार्बन डायआॅक्साईड
    कार्बन मोनॉक्साइड
    सल्फर आॅक्साईड
    नायट्रोजन ओक्साईड
    हायड्रो क्लोरिक असिड
    हायड्रोजन फ्लुओराईड
    जड धातू

भस्मीकरण प्रक्रियेचा वापर -
जैवभार स्राेत    उत्पादन    वापर
लाकूड    उष्णता, वाफ, वीज    सहनिर्मिती प्रकल्प, उद्योग धंद्यासाठी उष्णता, वाफ व वीज, शहरातील टाकाऊ घटकांची विल्हेवाट.     

शहरासाठी ऊर्जा उपलब्धता. 
    लाकडाचे टाकाऊ घटक
    जंगलातील घटक
    वळलेला टाकाऊ जैवभार
    शहरातील घन टाकाऊ पदार्थ

- डॉ. वैभवकुमार शिंदे, ९९६०९७५२७१ (कृषी अभियांत्रिकी विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, औरंगाबाद)

Web Title: agro news system incest