उपकरणांनी तपासा पाण्याची गरज

डॉ. मेहराज शेख
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

चांगले उत्पादन मिळविण्यासाठी पिकाला योग्यवेळी सिंचन ही महत्त्वाची बाब आहे. जमिनीच्या प्रकाराची माहिती समजली की सिंचनमात्रा ठरविण्यासाठी विविध उपकरणांची मदत घेता येते. या उपकरणांच्यामुळे जमिनीतील ओलावा समजतो. त्यानुसार पिकाला पाणी नियोजन करता येते.

उपकरणांच्या सहाय्याने पिकाची पाण्याची गरज जाणून घेतल्याने उपलब्ध पाण्याची बचत होते. तसेच अतिरिक्त पाण्याच्या वापराने निर्माण होणारी रोगांची समस्या, जमिनीच्या क्षारपड, चोपण होण्याची समस्या आदींपासून बऱ्याच अंशी नियंत्रण आणता येते. 

पाण्याची गरज तपासणारी उपकरणे -
सूक्ष्म सिंचनाच्या योग्य वापरामुळे पाण्याची बचत होते. जमिनीच्या विविध थरांतील मगदूर पाहून त्यानुसार पिकाची पाण्याची योग्य वेळ तपासणीकरिता एफडीआर, टीडीआर, टेन्सीओमीटर, पेनीट्रोमीटर अशा उपकरणांचा वापर करावा. 

या उपकरणांच्यामुळे जमिनीच्या विविध थरांत पाण्याची उपलब्धता कळते, पिकाच्या मुळाच्या विस्तारानुसार पाण्याचे नियोजन करता येते. 

एक टक्का सेंद्रिय कर्ब दहा पटीने जास्त ओलावा साठवून ठेवतो. त्यामुळे जमिनीच्या आरोग्याप्रमाणे सिंचनाची गरज व दोन सिंचन पाळ्यात योग्य अंतर ठेवता येते.

पाण्याची गरज दर्शविणाऱ्या वनस्पती
काहीवेळा पाण्याची गरज दर्शवण्यासाठी विशिष्ट वनस्पतीदेखील उपयोगी ठरतात.

आयसोहायड्रिक वनस्पती पाण्याला अतिशय संवेदनशील असतात. असा वनस्पतींची मुख्य पिकात काही ठिकाणी लागवड करावी. त्यामुळे जमिनीतील ओलाव्याची उपलब्धता लक्षात येते. उदाहरणार्थः डॅनडेलीथॉन, सूर्यफूल, ट्री फर्न इत्यादी वनस्पती 

या वनस्पतींच्या रोजच्या निरीक्षणातून ताबडतोब सिंचनाची आवश्‍यकता ओळखता येते. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास  या वनस्पतींची पाने, फुले, खोड निस्तेज दिसू लागतात. वनस्पती कोलमडतात.

मुख्य अन्नधान्य पिकात (अन आयसोहायड्रिक) ही निरीक्षणे दिसत नाहीत. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास ही पिके त्याची वाढ व प्रकाश संश्‍लेषण, अन्नद्रव्य वहन इत्यादी क्रियांवर नियंत्रण आणतात; मात्र आयसोहायड्रिक वनस्पती पाणी दिल्याबरोबर लगेच टवटवीत, लुसलुशीत व हिरवीगार होतात. त्यामुळे सिंचनाची योग्य वेळ ओळखता येते.

- डॉ. मेहराज शेख, ९९७०३८७२०४. (मृदाशास्त्रज्ञ, पाटबंधारे विभाग, परभणी )
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agro news Water needs water check