देशातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नवी दिल्ली - देशात यंदा बऱ्याच भागात माॅन्सूनने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावली तर अनेक भागांत परतीच्या पावसानेही दांडी मारली, त्यामुळे देशातील बऱ्याच महत्त्वाच्या जलाशयांमध्ये पाणीसाठा कमीच झाला होता. सध्या उन्हाचा चटका वाढला असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

नवी दिल्ली - देशात यंदा बऱ्याच भागात माॅन्सूनने सरासरीपेक्षा कमी हजेरी लावली तर अनेक भागांत परतीच्या पावसानेही दांडी मारली, त्यामुळे देशातील बऱ्याच महत्त्वाच्या जलाशयांमध्ये पाणीसाठा कमीच झाला होता. सध्या उन्हाचा चटका वाढला असल्याने पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

देशातील महत्त्वाच्या ९१ जलाशयांमध्ये २८ मार्चला ४६.१३६ बीसीएम पाणीसाठा होता. या जलाशयांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा हा एकूण क्षमतेच्या केवळ २८ टक्के होता. मागील वर्षी याच काळात ४१ टक्के पाणीसाठा होता. यंदा त्यात १३ टक्के वाढ झाली आहे, तर मागील दहा वर्षांतील सरासरी पाणीपातळीच्या ११ टक्के कमी पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. सर्वसाधारण सरासरी पाणीपातळी ही ३९ टक्के आहे. या महत्वाच्या जलाशयांमध्ये पाणीसाठा झपाट्याने घटत असल्याने येणाऱ्या दिवसांत पाणी पडेपर्यंत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. घटत्या पाणीपातळीमुळे देशातील काही राज्यांमध्ये रब्बी व उन्हाळी पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण होऊ शकते.

‘‘सध्या जलाशयांमध्ये असलेला पाणीसाठा हा मागील दहा वर्षांतील पाणीसाठ्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. मात्र यामुळे पाणीटंचाई भीषण होईल असे वाटत नाही. हे केवळ हंगामात पाऊस कमी झाल्याने झाले आहे,’’ असे केंद्रीय पाणी आयोगाने म्हटले आहे. 

उन्हाळी पिकांना फटका
जलाशयातील पाणीपातळी घटल्याने त्याचा फटका हा उन्हाळी पिकांना बसणार आहे. शेतकरी उन्हाळी पिकांची लागवड करताना जलशयातील किंवा विहरी, बोअरवेल यातील पाण्याचा वापर करतात. देशात हिरवा भाजापाला आणि कडधान्ये ही महत्त्वाची उन्हाळी पिके आहेत. पाणीसाठ्याच्या घटीचा कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील उन्हाळी पाकांवर परिणाम होणार आहे.  

गुजरातमध्ये टंचाई
गुजरात राज्यातील जलशयांमध्ये ३५ टक्के कमी पाणीसाठा आहे. येथे आतापासूनच पाणीटंचाई जाणवत असून, सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून शेतीसाठा होणारा पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच शेतकऱ्यांना उन्हाळी पिके न घेण्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. अनेक गावांमध्ये आतापासूनच पिण्याच्या पाण्यासाठा भटकंती करावी लागत आहे. 

कमी मॉन्सूनचा परिणाम
साधारपणे जलाशयांमध्ये मॉन्सूनमुळे जवळपास तीन चतुर्थांश पाणीसाठा होतो. मागील वर्षी मॉन्सून सरासरीच्या ५ टक्के कमी झाला. त्यातही सर्वाधिक पाऊस हा पहिल्याच टप्प्यात झाला. मात्र परतीच्या पावसाने पाहिजे तेवढी हजेरी लावली नाही. मात्र परतीच्या पाऊस कमी झाला. आॅक्टोबर ते डिसेंबर या काळात सरासरीच्या ११ टक्के पाऊस कमी झाला. जानेवारी ते फेब्रुवारी या काळात ६३ टक्के पाऊस झाला, तर परतीचा पाऊस हा सरासरी पडणाऱ्या पावसाच्या ६३ टक्के कमी होता. 

तमिळनाडूत सर्वाधिक घट
तमिळनाडू राज्यात सध्याचा पाणीसाठा हा सरासरीच्या ६४ टक्क्यांनी कमी आहे. आंध्र प्रदेशात सरासरीच्या ५४ टक्के तर उत्तराखंडमध्ये सरासरीच्या ४० टक्के आणि पंजाबमध्ये सरासरीच्या ३८ टक्के पाणीसाठा कमी आहे. गुजरातमध्ये सरासरीच्या पाणीसाठ्यापेक्षा ३५ टक्के कमी पाणीसाठा आहे.

गुजरात सरकारने उन्हाळी पिकांना पाणी देणे बंद केले आहे. या निर्णयामुळे राज्यातील भुईमूग आणि कापूस ही उन्हाळी पिके प्रभावित होणार आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसेल. 
- व्यास पांडे, कृषी शास्त्रज्ञ, आनंद, गुजरात  

जलाशयातील पाणीसाठ्यात घट होऊन त्याचा परिणाम उन्हाळी पिकांवर होणार असला, तरी त्यामुळे एकूण उत्पन्नावर काही परिणाम होणार नाही. उन्हाळी पिके खूपच कमी प्रमाणात घेतली जातात. 
- के. के. सिंग, कृषी हवामान विभाग प्रमुख, भारतीय हवामान विभाग

Web Title: agro news water storage decrease in country