जनावरांद्वारे उत्सर्जित होणाऱ्या मिथेन वायूचे व्यवस्थापन

डॉ. रणजित इंगोले, डॉ. महेश इंगवले, डॉ. सुनील हजारे
मंगळवार, 30 मे 2017

हरितगृहातील वायू 
काही वायू (गॅस) वातावरणात मिसळून सूर्याची किरणे शोषून घेतात, त्यामुळे वातावरणातील तापमान वाढते. अशा वायूंना हरितगृहातील वायू (ग्रीन हाउस वायू) असे म्हणतात. 

ग्रीन हाउस वायूंमध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड , मिथेन, नायट्रस ऑक्साइड व ओझोन या वायूंचा समावेश होतो. पृथ्वीवर ग्रीन हाउस वायू नसते, तर पृथ्वीचे तापमान जवळपास १८ अंश सेल्सिअस राहिले असते. परंतु ग्रीन हाउस वायूमुळे पृथ्वीवरील सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस आहे. 

हरितगृहातील वायू 
काही वायू (गॅस) वातावरणात मिसळून सूर्याची किरणे शोषून घेतात, त्यामुळे वातावरणातील तापमान वाढते. अशा वायूंना हरितगृहातील वायू (ग्रीन हाउस वायू) असे म्हणतात. 

ग्रीन हाउस वायूंमध्ये प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड , मिथेन, नायट्रस ऑक्साइड व ओझोन या वायूंचा समावेश होतो. पृथ्वीवर ग्रीन हाउस वायू नसते, तर पृथ्वीचे तापमान जवळपास १८ अंश सेल्सिअस राहिले असते. परंतु ग्रीन हाउस वायूमुळे पृथ्वीवरील सरासरी तापमान १५ अंश सेल्सिअस आहे. 

औद्योगीकरणात वाढ झाल्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड तसेच इतर दूषित वायूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत अाहे, त्यामुळे जागतिक तापमानात वाढ होत आहे. मिथेन वायूचा वातावरणावर होणारा परिणाम हा कार्बन डायऑक्साइड वायूमुळे होणाऱ्या परिणामांपेक्षा जवळपास २३ पट अधिक असतो. 

मिथेन वायू जमिनीमध्ये तसेच समुद्राच्या तळाशी प्रामुख्याने अधिक प्रमाणात असतो. हा मिथेन वायू जर जमिनीखालील किंवा समुद्रतळातील वातावरणात मिसळला तर त्याला वायुमंडलीय मिथेन असे म्हणतात. 

कार्बन डायऑक्साइड अाणि मिथेन वायू सूर्यकिरणांचे शोषण करून तापमान वाढविण्यास मदत करतात. त्यामुळे जागतिक तापमान वाढ होत अाहे.

उपाययोजना
वातावरणातील मिथेन वायू वाढविण्यामध्ये दुधाळ जनावरांची महत्त्वाची भूमिका असली, तरी योग्य त्या उपाययोजना केल्यास निश्चितच मिथेन वायूचा उपयोग मानवांच्या फायद्यासाठी करता येऊ शकतो. काही विकसनशील देशात जनावरांद्वारे निर्मित मिथेन वायू नियंत्रित करण्यासाठी डेअरी फार्मवर मिथेन डायजेस्टर लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मिथेन डायजेस्टरमुळे शेणापासून तयार होणाऱ्या मिथेन वायूचे रुपांतर इंधनामध्ये करुन त्याचा उपयोग वीज तयार करण्यासाठी करता येतो. 

मिथेन डायजेस्टर महाग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करणे शक्य होत नाही. त्यामुळे जनावरांच्या शेणापासून तयार होणाऱ्या मिथेन वायूचा वापर गोबरगॅसमध्ये करून त्यापासून तयार होणाऱ्या ऊर्जेचा उपयोग अन्न शिजविण्याकरिता घरगुती गॅस म्हणून करता येतो. त्यामुळे वातावरणात मिथेन वायूचे प्रमाण कमी करुन तापमान कमी करण्यास मदत होते.

जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा न मिळाल्यामुळे जनावरांपासून मिळणाऱ्या शेणाची प्रत घसरते. त्यामुळे चांगल्या प्रतीचे इंधन किंवा मिथेन तयार होत नाही. यावर उपाय म्हणून वेगवेगळ्या डेअरी फार्ममधून किंवा पशुपालकाकडून दुधाळ जनावरांचे शेण गोळा करून त्यापासून मोठ्या प्रमाणावर उपयोगी मिथेन वायू तयार करणे. मिथेनचा वापर वीज तसेच घरगुती गॅस उत्पादनासाठी केल्यास एकप्रकारे वातावरणात मिसळला जाणारा गॅस कमी होईल सोबतच वीज तसेच इंधनही मिळेल.

शेणापासून मिथेन तयार झाल्यावर मिळणाऱ्या शेणाचा (साका) उपयोग खत म्हणून करता येईल. 

संशोधनाद्वारे चाऱ्यामध्ये योग्य तो बदल करुन जनावरांच्या पोटातच मिथेन वायूची निर्मिती कमी करण्याच्या दिशेने नवीन संशोधनाला एक वेगळी चालना मिळाली आहे.
 

दुधाळ जनावरे वाढवितात वातावरणातील मिथेन वायू
वातावरणातील मिथेन वायू वाढविण्यामध्ये दुधाळ जनावरांचीही महत्त्वाची भूमिका आहे असे संशोधनातून दिसून अाले अाहे. 
जनावरांमध्ये मिथेन वायू प्रामुख्याने पोटामध्ये पचन क्रियेदरम्यान तयार होत असतो. हा तयार झालेला मिथेन वायू रवंथ करताना जनावरांच्या तोंडावाटे तसेच शेणावाटे वातावरणात मिसळतो. या व्यतिरिक्त शेणाच्या फसफसणाऱ्या क्रियेदरम्यानसुद्धा मिथेन वायू तयार होतो व तो वातावरणात सोडला जातो. 
नुकत्याच सन २०१६ च्या जनगणनेनुसार भारतात जवळपास ३० कोटी गाय व म्हैस वर्गीय प्राणी आहेत. शेळ्या, उंट, घोडे, वराह इत्यादीचा विचार केला तर हा आकडा जवळपास ५१ कोटींपेक्षा जास्त अाहे. यावरुन जनावरांमार्फत तयार होणाऱ्या मिथेन वायूमुळे तापमान किती वाढत असेल याचा अंदाज येईल. 
एक गाय दरवर्षी जवळपास ७० ते १२० किलो मिथेन वायू उत्सर्जित करीत असते. परंतु मिथेन वायूचा वातावरणावर होणारा नकारात्मक परिणाम हा कार्बन डायऑक्साइड वायूमुळे होणाऱ्या परिणामापेक्षा जवळपास २३ पट अधिक असल्याने एका गाईने एका वर्षात उत्सर्जित केलेला १०० किलो मिथेन वायू हा २३०० किलो कार्बडा यऑक्साइड वायू समान असतो. 

डॉ. रणजित इंगोले,  ९८२२८६६५४४
(पशुविकृतिशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पदव्युत्तर पशू विज्ञान संस्था, अकोला)

Web Title: agrowon Management of methane gas

टॅग्स