तुरीला ४०० रुपये वाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

केंद्र सरकारकडून ‘एमएसपी’ जाहीर
कापूस, ज्वारी आणि भाताला बोनस नाही

नवी दिल्ली - अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या किमान आधारभूत किमती (एमएसपी) केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. २०१७-१८ मधील खरीप हंगामासाठी कापूस आणि भाताला बोनस दिलेला नाही. तुरीला २०० रुपये बोनस, तर एमएसपीमध्ये २०० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे यंदा तुरीला ५४५० रुपये प्रतिक्विंटलचा दर राहील.

जून संपत आला तरी केंद्र सरकारने यंदाच्या खरिपासाठी पिकांच्या ‘एमएसपी’ जाहीर केल्या नसल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. देशभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवे काही अंगाशी येऊ नये म्हणून एमएसपीची लपवाछपवी सुरू असल्याचा संशयही कृषी क्षेत्रातून व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी देऊनही एमएसपी जाहीर केली जात नव्हती. अखेर केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर एमएसपी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये काही तेलबिया आणि डाळवर्गीय पिकांना २०० रुपये बोनस दिला जाणार आहे.

खरीप पीक दरवाढ २०१७-१८
(प्रतिक्विंटल रुपयांत) (कंसात वाढ + बोनस)
प्रकार/जात     जाहीर दर (एकूण वाढ)

भात 
सर्वसाधारण     १५५०(+८०)
‘ए’ ग्रेड     १५९० (+८०)

ज्वारी 
हायब्रीड     १७०० (+७५)
मालदांडी     १७२५ (+७५)
बाजरी     १४२५ (+९५)
मका     १४२५ (+६०)
नाचणी     १९०० (+१७५)
तूर    ५२५० (२००+२००)
मूग     ५३७५ (१५०+२००)
उडीद    ५२०० (२००+२००)

कापूस
मध्यम धागा    ४०२० (+१६०)
लांब धागा    ४३२० (+१६०)
भुईमूग    ४२५० (३०+२००)
सूर्यफूल    ४००० (५०+२००)
सोयाबीन : काळा    २८५० (७५+१००)
तीळ     ५२००  (१००+१००)
कारळे    ३९५० (१२५+१००)

Web Title: agrowon news 400 rs. increase in tur rate