सामूहिक प्रयत्नांतून व्यवसायवृद्धी शक्य

प्रशांत सावंत,  सारिका सासवडे 
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

कुठलाही व्यवसाय सुरू करण्याअाधी जागा, यंत्रे, कच्चा माल आणि महत्त्वाचे म्हणजे मजुरांची आवश्यकता असते. यासाठी सुमारे ७५ ते ८० टक्के आर्थीक गुंतवणूक करावी लागते. तसेच भांडवली खर्च निघून फायदा होण्यासाठी काही वर्षे लागतात. मधमाशीपालनामध्ये भांडवली खर्चाच्या मानाने मिळणारे उत्पन्न जास्त असते. भांडवलासाठी झालेला खर्च पहिल्या वर्षातच वसूल होतो. पेट्या जंगलात किंवा झाडाच्या सावलीत ठेवायच्या असल्यामुळे त्यांना वेगळा निवारा करण्याची गरज नसते. त्यामुळे त्यावर होणारा खर्च वाचतो. मधमाश्‍यांचे अन्न म्हणजे मकरंद किंवा पराग पिके, झाडेझुडपे, तणे इत्यादींच्या फुलातून उपलब्ध होतो अाणि तो विनामूल्य मिळतो.

कुठलाही व्यवसाय सुरू करण्याअाधी जागा, यंत्रे, कच्चा माल आणि महत्त्वाचे म्हणजे मजुरांची आवश्यकता असते. यासाठी सुमारे ७५ ते ८० टक्के आर्थीक गुंतवणूक करावी लागते. तसेच भांडवली खर्च निघून फायदा होण्यासाठी काही वर्षे लागतात. मधमाशीपालनामध्ये भांडवली खर्चाच्या मानाने मिळणारे उत्पन्न जास्त असते. भांडवलासाठी झालेला खर्च पहिल्या वर्षातच वसूल होतो. पेट्या जंगलात किंवा झाडाच्या सावलीत ठेवायच्या असल्यामुळे त्यांना वेगळा निवारा करण्याची गरज नसते. त्यामुळे त्यावर होणारा खर्च वाचतो. मधमाश्‍यांचे अन्न म्हणजे मकरंद किंवा पराग पिके, झाडेझुडपे, तणे इत्यादींच्या फुलातून उपलब्ध होतो अाणि तो विनामूल्य मिळतो. त्यामुळे मधपाळाचा मजुरीवर होणारा खर्च वाचतो. त्यामुळे इतर व्यवसायाशी तुलना करता मधमाशीपालनामध्ये खर्चाच्या मानाने उत्पन्नाने प्रमाण जास्त असते.

एकत्रित प्रयत्न होणे गरजेचे 
शेतीपूरक व्यवसायासाठी शेतीचा काही भाग वापरला जातो. परंतु, मधमाश्‍यासाठी वेगळ्या जागेची गुंतवणूक करावी लागत नाही. बांधावर, पडीक जागा, परसदारी कोठेही सुरक्षित ठिकाणी मधमाश्यांच्या पेट्या ठेवता येतात. 

वसाहतीमुळे पिकांचे पर परागसिंचन होऊन पिकांच्या एकरी उत्पादनात वाढ होते.  हा फायदा लक्षात घेऊन मधमाश्यांच्या वसाहतींना वर्षभर खाद्य मिळावे म्हणून पिकांचे व्यवस्थापन, वनशेती, सामाजिक वनीकरण इत्यादी कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे गरजेचे अाहे. 

मधमाश्‍यांची वसाहतीपासून जास्तीत जास्त एक किलोमीटर अंतरापर्यंत जातात. त्यामुळे मधमाश्यांच्या पेट्या एकाच ठिकाणी दाटीवाटीने न ठेवता, गटागटाने परंतु पसरून ठेवाव्या लागतात. 

ओरिसा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील आदिवासी आता मधमाशीपालनाकडे वळू लागले आहेत. त्यामुळे येथील तरुणांना गावातच रोजगाराचे साधन उपलब्ध होऊ लागले अाहे.  

मधमाशीपालनामध्ये फार गुंतागुंतीची अवजारे लागत नाहीत. मधमाशांसाठी लाकडी पेटी, मध काढण्याचे यंत्र व किरकोळ अवजारे इ. यंत्रससामुग्रीवर हा व्यवसाय सुरू करता येतो. 

हा व्यवसाय कुटुंबातील पुरुष, स्त्रिया, मुले करू शकतात. अावड म्हणूनही थोड्या पेट्या ठेवून हा व्यवसाय करता येतो. अनुकूल हवामानामध्ये अर्धवेळ किंवा संपूर्ण वेळ मधमाशीपालन व्यवसाय करता येतो. कृषी विभाग, वन विभाग,  सामाजिक संस्था तसेच महाराष्ट्र बी डेव्हलपमेंट फोरम यांच्या एकत्रित प्रयत्नातून या व्यवसायामध्ये वृद्धी करणे शक्य अाहे.

Web Title: agrowon news