डवरणी यंत्रातील सुधारणेतून बनविले पेरणी यंत्र

विनोद इंगोले
सोमवार, 10 जुलै 2017

अडचणी या माणसांच्या पाचवीलाच पूजलेल्या असतात. अशा अडचणीमध्ये जी व्यक्ती रडत बसण्यापेक्षा मार्ग काढण्याला प्राधान्य देते, तीच पुढे जाऊ शकते. मंगळसा (जि. वाशीम) येथील सुभाष पुरी यांनी आर्थिक स्थिती चांगली नसली तरी प्रयोगशीलतेतून अडचणीवर मात करता येते, हे दाखवून दिले आहे. 

अडचणी या माणसांच्या पाचवीलाच पूजलेल्या असतात. अशा अडचणीमध्ये जी व्यक्ती रडत बसण्यापेक्षा मार्ग काढण्याला प्राधान्य देते, तीच पुढे जाऊ शकते. मंगळसा (जि. वाशीम) येथील सुभाष पुरी यांनी आर्थिक स्थिती चांगली नसली तरी प्रयोगशीलतेतून अडचणीवर मात करता येते, हे दाखवून दिले आहे. 

वाशीम जिल्ह्यातील मंगळसा (ता. मंगरुळपीर) येथील सुभाष पुरी यांच्या घरची परिस्थिती एकदम हलाखीची. केवळ दीड एकर शेती करताना घरखर्च भागवण्यासाठी अन्य शेतकऱ्यांकडे मजुरीही करतात. या साऱ्या कष्टातून नववीमध्ये असलेल्या मुलांच्या शिक्षणांचा खर्च भागवला जातो. अशा स्थितीमध्ये पेरणीसाठी बैलजोडी किंवा ट्रॅक्टर भाड्याने घेणे त्यांना परवडत नव्हते. पेरणी करण्यासाठी त्यांनी डवरणी यंत्रामध्येच सुधारणा करून घेतल्या. डवरणी यंत्रणाला दोण फण आणि दोन चाडे बसवले. यासाठी सुमारे ६०० रुपये खर्च आला. यातील एका चाड्यातून खत, तर दुसऱ्यातून बियाणे सोडले जाते. सोयाबीन जास्त खोल पेरावे लागत नसल्याने फण खोलातून चालवावे लागत नाहीत. त्यामुळे बैलांऐवजी माणसांच्या साह्याने ते ओढता येते. खत व बियाणे सोडण्यासाठी अशा आणखी दोन व्यक्ती लागतात. सोयाबीन दीड एकर क्षेत्रावर पेरणीसाठी दीड दिवस लागल्याचे सुभाष पुरी यांनी सांगितले. 

सिंचनासाठी कातळाशी झुंज 
सिंचन सुविधा नसल्याने उत्पादनामध्ये शाश्वतता नव्हती. त्यावर मात करण्यासाठी सुभाष पुरी यांनी स्वतःच कुटुंबीयांसह विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. ११ फूट खोदल्यानंतर कातळ (खडक) लागला. तो फोडणे माणसांच्या साह्याने शक्य नव्हते. त्यामुळे काम थांबले. तरीही या विहिरीमध्ये ११ महिन्यांपर्यंत पाणी राहते. त्यावर त्यांना सोयाबीननंतर तूर किंवा हरभरा लागवड करता येते. पाण्याच्या उपलब्धतेवर पिकाचा निर्णय होतो. पाणी उपशासाठी रॉकेलवर चालणारा पंप वापरतात. या साऱ्या कष्टातून त्यांनी आपल्या एकुलत्या एका मुलीचे लग्न केले. आता मुलगा सहदेव नववीत शिकत आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पाकधने यांची मदत त्यांना होते.  

सुभाष पुरी, ७३५०८५२२०१

Web Title: agrowon news agriculture