विक्रीतील मध्यस्थ हटवून वाढवला शेतीतील नफा

विनोद इंगोले 
शुक्रवार, 7 जुलै 2017

शेतीतील एकूण उत्पन्नात सुमारे ५० टक्के वाटा फूलशेतीतून, उर्वरित उत्पन्न उन्हाळ्यात रसवंती व थोडाफार वाटा नर्सरीतून अशी शेतीची रचना माहूली (चोरे) (जि. अमरावती) येथील चोरे कुटुंबीयांनी आखली आहे. शेतीतील मध्यस्थ कमी करून थेट विक्री करून नफा वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. व्यावसायिक शेतीचे त्यांचे फायदेशीर मॉडेल अभ्यासण्याजोगे आहे.

अमरावती-यवतमाळ मार्गावर चोरे यांची दोन भावांत मिळून आठ एकर शेती. अमरावती शहरापासून त्यांचे गाव अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असून अर्ध्या तासात शहरात पोचणे शक्‍य असते. ही संधी घेत शहरातील बाजारपेठेचा अंदाज घेत त्यांनी पीकपद्धती निवडीवर भर दिला आहे. 

शेतीतील एकूण उत्पन्नात सुमारे ५० टक्के वाटा फूलशेतीतून, उर्वरित उत्पन्न उन्हाळ्यात रसवंती व थोडाफार वाटा नर्सरीतून अशी शेतीची रचना माहूली (चोरे) (जि. अमरावती) येथील चोरे कुटुंबीयांनी आखली आहे. शेतीतील मध्यस्थ कमी करून थेट विक्री करून नफा वाढवण्यावर त्यांनी भर दिला आहे. व्यावसायिक शेतीचे त्यांचे फायदेशीर मॉडेल अभ्यासण्याजोगे आहे.

अमरावती-यवतमाळ मार्गावर चोरे यांची दोन भावांत मिळून आठ एकर शेती. अमरावती शहरापासून त्यांचे गाव अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर असून अर्ध्या तासात शहरात पोचणे शक्‍य असते. ही संधी घेत शहरातील बाजारपेठेचा अंदाज घेत त्यांनी पीकपद्धती निवडीवर भर दिला आहे. 

आंतरपिकांचा आदर्श 
ग्लॉडिओलसमध्ये टोमॅटो आंतरपीक म्हणून ते घेतात. मुख्य पिकाची जोखीम त्यातून कमी करण्याचा प्रयत्न यामागे असतो. अॅस्टरमध्ये मिरची लागवड होते. हरभरा पिकात टरबूज लागवडीचा प्रयोग एकेवर्षी केला. टोमॅटोत मका घेऊन त्याद्वारे टोमॅटो रोपांना बसणाऱ्या उन्हाच्या झळा कमी करण्याचा हेतू साध्य केला. 

जिवंत कुंपणाचा प्रयोग
बांधावर उत्पन्नक्षम झाडांची लागवड व जिवंत कुंपणाचा हेतू साधला आहे. बांधावर हदग्याच्या झाडांची लागवड केली असून त्यामधील भागात सागवान वृक्ष आहेत. हदग्याच्या फुलांचा वापर पिठल्यामध्ये केला जातो. त्यामुळे किलोला १० रुपये दराने ही फुले विकून अतिरिक्त उत्पन्न मिळवले आहे. 
आता काही झाडे कमी झाली आहेत. 

मार्केट अोळखून लागवड  
हंगामनिहाय फुलांच्या लागवडीवर भर राहतो. मागणी तसा पुरवठा हा अर्थशास्त्रीय सिद्धांत त्यांनी अंमलात आणला आहे. दिवाळी, दसरा, गणपती, नवरात्र यावेळची मागणी लक्षात घेऊन झेंडू लागवड करतात. अॅस्टर वर्षभर शेतात राहतो. दर्गा तसेच काही दुकानदारांसाठी मागणी लक्षात घेऊन गावरान गुलाब घेतात. त्यातून फार काही हाती पडत नसले तरी ग्राहक टिकवण्याची वृत्ती जपली आहे.  
ग्लॅडिओलसच्या दहा फुलांचा बंच राहतो. या बंचची वीस रुपयांना विक्री होते. परिसरात या फुलांचे उत्पादन कमी असल्याने मागणी राहते. 

थेट विक्रीवर भर   
बाजार समितीत अडत, हमाली आदी भानगडीत न पडता थेट फूल व्यावसायिकांना फुलांची विक्री करण्यावर चोरे यांचा भर असतो. 
या माध्यमातून नफ्याचे मार्जीन वाढविण्याचा प्रयत्न होतो. बिजली व ॲस्टर यांचा वीस रुपये प्रति किलो दर फूलविक्रेत्यांसोबत बांधून घेतला आहे. एखाद्या वेळी गुलाबाला मागणी नसेल तर शिल्लक गुलाबांपासून गुलकंद तयार करून त्याची विक्री थेट रसवंतीगृहावरून केली जाते.

कुटुंबीयांचे सहकार्य
शेतीतील मजुरांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी चोरे परिवारातील सदस्य शेतीत राबतात. अरविंद चोरे त्यांची तीन मुले, सुना आणि मुले सारे एकत्र राहतात. एकत्रित कुटूंब पद्धतीचा वारसा कुटूंबाने चालविला आहे. गोपाल यांना भाऊ नंदकिशोर व मोहन यांची मोठी मदत होते.  

इतरांसाठी प्रेरणास्त्रोत
युवा प्रयोगशील शेतकरी अशी अोळख गोपाल यांनी मिळवली आहे. 
परिसरातील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शेतावर प्रकल्प दिला जातो. कृषी विभागाच्या प्रशिक्षण वर्गांचे आयोजनही होते.  

कल्पकता
रसवंती
अमरावती- यवतमाळ रस्त्यावर शेताजवळ रसवंती सुरू केली. या व्यवसायात सात- आठ वर्षे सातत्य ठेवले आहे. या मार्गावर सतत येजा सुरू असते. त्यातून ग्राहकांची संख्या वाढते. दिवसाला साडेतीन हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यातील २० टक्के नफा असतो. पूरक व्यवसाय हेच पारंपरिक शेतीची आर्थिक नाळ ठरतात हा विश्‍वास रुजविण्यात चोरे यशस्वी झाले आहेत. ते रसासाठी घरचा व अन्य शेतकऱ्यांकडील ऊसही वापरतात. गावातील तीन युवकांनाही या माध्यमातून रोजगार दिला आहे.   

रसवंतिगृहाद्वारे सेंद्रिय भाजीपालाही 
ग्राहक रस पिण्यासाठी थांबतात त्या वेळी सेंद्रिय भाजीपाला त्यांना आकर्षित करून घेतो. हीच मार्केटिंगची कल्पकता साधली आहे. या माध्यमातून भाजीपालादेखील हातोहात संपतो. उन्हाळ्यात त वांगी, टोमॅटो, मिरची, पालक, मेथी, कोथिंबीर, फ्लॉवर आदी भाजीपाला पिके सेंद्रिय पद्धतीने घेण्यावर भर राहतो. प्रत्येक पिकाचे क्षेत्र सरासरी दहा गुंठ्यांचे राहते. थेट विक्रीमुळे वाहतूक व अन्य खर्चही वाचतात. दरदिवशी सुमारे पाचशे रुपयांच्या भाजीपाल्याची विक्री होते. 

फूलपिकांत विविधता 
घरालगतच्या चार एकरांत फुलशेतीचे व्यवस्थापन होते. गावरान गुलाब दीड एकर तर अर्धा एकर व्यावसायिक गुलाब क्षेत्र सुमारे आठ वर्षे होते. यंदाच बाग काढली आहे. आता नवी लागवड होईल.एक एकरात अॅस्टर तीन टप्प्यात घेतला आहे. त्याचे सरासरी लागवड क्षेत्र दरवर्षी चार एकरांचे राहते. शेवंती (बिजली) दीड एकरावर, वीस गुंठ्यांवरील ग्लॅडीओलस यंदा पाच गुंठ्यात, निशीगंध दहा गुंठे, झेंडू चार एकर असे फूलशेतीचे क्षेत्र विभागले आहे. 

गोपाल चोरे, ७३५०५८९०७० 

Web Title: agrowon news agriculture agri