बारामतीचे केव्हीके बनणार ‘आयडियल फार्मर्स सेंटर‘

बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

बारामती, जि. पुणे - टोमॅटोचे झाड ४० फुटांपर्यंत उंचीचे असेल...त्याचे उत्पादन नऊ महिने चालेल...तेच नव्हे तर सर्वच भाजीपाल्याची रोपेदेखील गावठी खुंट ते जगातील सर्वांत चांगल्या संकरीत जातीच्या खुंटाची कलमे केलेली असतील...एक चौरस मीटरमध्ये वीस किलो उत्पादनाऐवजी मिळेल ७० किलो उत्पादन...झाडे असतील रोगप्रतिकारक...मातीविना शेतीतील पुढचा प्रयोग आणि फळांचे आकारही अधिक मोठे असतील...भाजीपाल्यास त्या दिवशी सूर्याची उष्णता जेवढी तीव्र, तेवढ्याच पद्धतीचे पाणी दिले जाईल...ही सारी स्वप्नवत कल्पना वाटतेय; परंतु हे सारे आता शेतकऱ्यांच्या आवाक्‍यात आणलेय शारदानगरच्या ‘इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्राने.

बारामती, जि. पुणे - टोमॅटोचे झाड ४० फुटांपर्यंत उंचीचे असेल...त्याचे उत्पादन नऊ महिने चालेल...तेच नव्हे तर सर्वच भाजीपाल्याची रोपेदेखील गावठी खुंट ते जगातील सर्वांत चांगल्या संकरीत जातीच्या खुंटाची कलमे केलेली असतील...एक चौरस मीटरमध्ये वीस किलो उत्पादनाऐवजी मिळेल ७० किलो उत्पादन...झाडे असतील रोगप्रतिकारक...मातीविना शेतीतील पुढचा प्रयोग आणि फळांचे आकारही अधिक मोठे असतील...भाजीपाल्यास त्या दिवशी सूर्याची उष्णता जेवढी तीव्र, तेवढ्याच पद्धतीचे पाणी दिले जाईल...ही सारी स्वप्नवत कल्पना वाटतेय; परंतु हे सारे आता शेतकऱ्यांच्या आवाक्‍यात आणलेय शारदानगरच्या ‘इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्राने. यामुळे हे केंद्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आयडियल फार्मर्स सर्व्हिस सेंटर बनणार आहे. 

बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात इंडो-डच तंत्रज्ञानाचे सेंटर ऑफ एक्‍सलन्स हे भारतीय भाजीपाल्याच्या शेतीला वेगळी दिशा व तंत्रज्ञान देणारे पहिले सेंटर आहे. भाजीपाल्याच्या जाती व विविध प्रकारच्या उच्च गुणवत्तेच्या रोपांचे उत्पादन, त्याचे वितरण यात हे केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे. शारदानगरच्या या इंडो-डच भाजीपाला गुणवत्ता केंद्रात सध्या टोमॅटो, मिरची, काकडी, रंगीत ढोबळी मिरची, स्ट्रॉबेरी अशी पिके घेतली गेली आहेत. भविष्यात मातीविना शेतीच महत्त्वाची ठरणार असल्याने तिचे महत्त्व दाखविण्यासाठी प्रत्येक भाजीपाल्याची मातीविना व मातीतील पिकांची प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत. साहजिकच या दोन प्रकारच्या आधुनिक शेतीतही भाजीपाल्याच्या वाढीतील फरक, उत्पादनातील व फळांच्या आकारातील फरक व कीडरोगाच्या प्रतिबंधक क्षमतेचीही तपासणी शेतकऱ्यांना स्वतः करता येईल. 

या केंद्रात उच्च तंत्रज्ञानयुक्त रोपवाटिका आहेत. टोमॅटोच्या मशाडो, लीडरटॉम, सिल्वियाना, सवान्टीस, नोवारा, केएसपी- अशा १३७ जाती, ढोबळीच्या बचाटा, बंगी, इन्सिरेशन, निमेलाइट, अल्मरांटी, ॲटलांटी अशा सर्वच भाजीपाल्याच्या प्रत्येकी एकाहून अधिक जाती महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपर्यंत पोचवून भाजीपाल्याच्या बाबत महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. प्रतिवर्षी २५ लाखांपर्यंतची भाजीपाल्याची रोपे तयार करण्याची या प्रकल्पाची क्षमता असून, यापुढील काळात त्यात शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाढ करता येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोपांची गुणवत्ता वाढविणे, त्यांचे आयुष्यमान वाढविणे, उत्पादनाच्या वाढीसह त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यावर भर राहणार आहे. शेतकऱ्याला भाजीपाला लागवडीपासून ते काढणी व काढणीपश्‍चात तंत्रज्ञानाची माहिती एकाच ठिकाणी प्रात्यक्षिकासह येथे मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news baramti Ideal Farmers Center