मधमाशीपालनातून.... एकरी उत्पादन वाढले, मधालाही मार्केट मिळाले  

मधमाशीपालनातून.... एकरी उत्पादन वाढले, मधालाही मार्केट मिळाले  

नागपूर जिल्ह्यातील बारव्हा (ता. उमरेड) हे सुधाकर रामटेके यांचे गाव. तेथे त्यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे ३६ एकर शेती आहे. शेतीत भात, सोयाबीन, कापूस, मिरची आदी पिके असतात. मात्र, केवळ पीक उत्पादनावर भर न देता रामटेके यांनी मधमाशीपालनाची पूरक जोड शेतीला दिली आहे. सुमारे २५ एकरांवर घेतलेले सूर्यफूल हे त्यांच्या शेतीचे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. 

मधमाशीपालन व्यवसाय
सूर्यफुलात परागीभवनाला फार महत्त्व आहे. या कामात मधमाश्यांचे मोठे योगदान राहते. हेच महत्त्व अोळखून २०१४ पासून व्यावसायिक मधमाशीपालन सुरू केले.
सध्या पेट्यांची संख्या- ३५०
यात २०० पेट्या खादी ग्रामोद्योग संस्थेकडून ३५ टक्के अनुदानावर घेतल्या.
मधमाश्यांचा प्रकार- एपीस मेलीफेरा 
पेटीतून मध काढण्यासाठी मानवचलित सयंत्र खरेदी केले आहे. त्यावर सुमारे १३ हजार रुपयांचा खर्च झाला. त्यातून दिवसाला 
१५० पेट्यांमधील मध संकलित करता येतो.  

एकीचा फायदा 
ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पेट्या ठेवल्या जातात तेथे तंबू बांधून राहावे लागते. मात्र, आपण एकटे न राहाता आपल्यासोबत अन्य मधमाशीपालकही असतात. सर्वजण एकत्र असल्याने त्याचा मोठा फायदा होतो, असे सुधाकर म्हणाले.  

सुरवातीचे प्रयत्न व प्रोत्साहन 
सूर्यफुलाचा पेरा वाढलेल्या बारव्हा भागात ‘आत्मा’च्या पुढाकाराने मधमाशीपालनाला प्रोत्साहन देण्यात आले आहे. ‘आत्मा’चे तत्कालीन प्रकल्प संचालक मिलिंद शेंडे, उपसंचालक प्रभाकर शिवणकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले. रामटेके या युवकाने त्या दिशेने पहिले पाऊल टाकत मधमाशीपालन सुरू केले. मध संकलनासाठी सुरवातीला केवळ १५० पेट्या त्यांच्याकडे होत्या. मधाला मागणी वाढू लागल्याने त्यांनी पेट्याची संख्या वाढविली. पॅकिंगमधील मधाची विक्री रामटेके यांनी विविध कृषी प्रदर्शने व मेळाव्यांतून केली आहे. त्यातून आपल्या उत्पादनाचे ‘प्रमोशन’ केले. 

शेतकरी गटाची बांधणी 
सिद्धार्थ शेतकरी स्वयंसहायता समूहाचे सुधाकर रामटेके अध्यक्ष आहेत. या गटात साहेब सोमकुंवर, कैलास सोमकुंवर, शुद्धाेधन रामटेके, संघरत्न रामटेके, रोहिणी रामटेके, जगदीश रामटेके, शकुंतला रामटेके, पारिसनाथ रामटेके, सुकेशनी रामटेके व कोमल रामटेके आदींचा समावेश अाहे. 

सूर्यफूल क्षेत्रात वाढ
उमरेड तालुक्‍यातील बारव्हा परिसरात सूर्यफुलाची लागवड दहा ते पंधरा वर्षांपासून होते. सोयाबीन पीक या भागात आल्यानंतर शेतकरी तिकडे वळले. त्यामुळे सूर्यफुलाखालील क्षेत्र काही काळ कमी झाले, असे रामटेके म्हणाले. मात्र, सोयाबीनच्या दरात सातत्याने होणारी घट, गहू आणि हरभरा उत्पादकांना पाणी समस्या भेडसावू लागल्याने ते पुन्हा सूर्यफुलाकडे वळले. आप्तुर, बामणी, पिपळा, खुडगाव, ठोबर, निरवा, पारवा, बेलचाकरा, अकोला आदी भागातील शेतकरी सूर्यफूल घेतात. बारव्हा व लगतच्या गावातील २००७-०८ च्या दरम्यान असलेले हे क्षेत्र ३०० हेक्‍टरपर्यंत होते. टप्प्याटप्प्याने त्यात वाढ होत ते १६०० हेक्‍टरवर पोचले आहे.

व्यवसायात महत्त्वाचे काय? 
या व्यवसायात रामटेक यांना आपल्या मधपेट्या घेऊन महाबळेश्‍वर, मुंडगाव (अकोला), इटावा (उत्तर प्रदेश) आदी विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात दरवर्षी जावे लागते. 
त्यासाठीची निवडतात ही पिके- तीळ, सूर्यफूल, शेवगा, मोहरी, जवस, डाळिंब, बरसीम
शेतकऱ्यांच्या शेताला पडीक सरकारी जागेतील कुरणेही ठरतात पर्याय
पेट्या हलविण्यासाठी १० ते ११ रुपये प्रतिकिलोमीटरप्रमाणे ट्रकचे भाडे द्यावे लागते. 
स्थलांतरित ठिकाणी ३५० पेट्यांच्या देखभालीसाठी तीन कामगारांची गरज भासते. याप्रमाणे महिन्याला सरासरी १८ हजार रुपयांचा खर्च होतो. 

सुधाकर रामटेके, ७३८७२६७३२७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com