साताऱ्यात वांगी दहा किलोस ५०० ते ६०० रुपये

साताऱ्यात वांगी दहा किलोस ५०० ते ६०० रुपये

सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) फ्लॉवर, हिरवी मिरची, ढोबळी मिरचीच्या आवकेत वाढ झाल्याची माहिती बाजार समिचीच्या सूत्रांनी दिली. वांग्याची सात क्विंटल आवक झाली, त्यास दहा किलोस ५०० ते ६०० रुपये दर मिळाला.

गाजराची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळाला. टोमॅटोची २१ क्विंटल आवक झाली, तर दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. कोबीची २३ क्विंटल आवक होऊन दहा किलो कोबीस २०० ते २५० रुपये दर मिळाला. दोडक्‍याची चार क्विंटल आवक झाली होती, त्यास दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. वाटाण्याची तीन क्विंटल आवक झाली, दहा किलो वाटाण्यास ७०० ते ८०० रुपये दर मिळाला. पावट्याची सहा क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ४०० रुपये दर मिळाला. शेवग्याची दोन क्विंटल आवक झाली, त्यास दहा किलोस ६०० ते ८०० रुपये दर मिळाला. भूईमूग शेंगेची दोन क्विंटल आवक होऊन दहा किलोस ३०० ते ३५० रुपये दर मिळाला. गवारीची १४ क्विंटल आवक तर दर दहा किलोस २०० ते ४०० रुपये मिळाला. फ्लॉवरची १३ क्विंटल आवक होऊन दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. हिरवी मिरचीची १८ क्विंटल आवक तर दर दहा किलोस २०० ते २५० रुपये दर मिळाला. ढोबळी मिरचीची पाच क्विंटल आवक झाली होती, तीस दहा किलोस २०० ते ३०० रुपये दर मिळाला. पालेभाज्यात मेथीची १८०० जुड्याची आवक होऊन तीस शेकड्यास १२०० ते १५०० रुपये दर मिळाला. कोथिंबिरीची २००० जुड्याची आवक होऊन शेकड्यास २००० ते २५०० रुपये दर मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com