मॉन्सूनला पुढे सरकण्यास अनुकूल स्थिती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 जून 2017

पुणे - विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीपर्यंत दाखल झालेला मॉन्सून भंडारा, नागपूर, गोंदियाकडे सरकण्यास अनुकूल स्थिती आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मॉन्सून विदर्भाच्या उत्तर भागात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला. 

उत्तर भारतात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे मॉन्सून हळूहळू उत्तरेकडे सरकत आहे. सध्या मॉन्सूनने गुजरातमधील वलसाड, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, विदर्भातील बुलडाणा, यवतमाळपर्यंत मजल मारली आहे. तसेच, छत्तीसगड, उडिसा, झारखंड, बिहारच्या काही भागांत येत्या दोन ते तीन दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. 

कोकण, विदर्भात पावसाचा इशारा 
येत्या गुरुवार (ता. २२) पर्यंत कोकण आणि विदर्भात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आज (सोमवारी) कोकणाच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात काही ठिकाणी सोसाट्याचा वारा व मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

कोकण व मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी शनिवारी (ता. १७) मुसळधार पाऊस पडला. तसेच कोकण, गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. तर अंबोणे, कोयना, डुंगरवाडी, ताम्हिनी, भिराया घाटमाध्यावरही जोरदार पाऊस पडला. सध्या मॉन्सूनची वाटचाल संथगतीने असली, तरी लवकरच मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.

Web Title: agrowon news favorable position to move the monsoon