हिरव्या चाऱ्यामुळे होते पोषण, दुग्धवाढ

डॉ. गजानन जाधव, डॉ. धीरज सवाई 
बुधवार, 9 ऑगस्ट 2017

हिरव्या चाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 
खनिजे आणि जीवनसत्त्वांची उपलब्धता असल्यामुळे जनावरांमधील खनिजे आणि जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग टाळता येतात. सकस हिरवा चारा दिल्यामुळे ढेप/खुराक कमी प्रमाणात लागतो. त्यामुळे खर्चात बचत होते. उत्पादनात वाढ मिळते. हिरवा चारा पचण्यास सोपा असल्याने तसेच रुचकर असल्याने जनावरे आवडीने खातात. हिरवा चारा साठविता येण्याजोगा असल्याने दुष्काळी काळात याचा वापर करता येऊ शकतो. 

हिरव्या चाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 
खनिजे आणि जीवनसत्त्वांची उपलब्धता असल्यामुळे जनावरांमधील खनिजे आणि जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे होणारे रोग टाळता येतात. सकस हिरवा चारा दिल्यामुळे ढेप/खुराक कमी प्रमाणात लागतो. त्यामुळे खर्चात बचत होते. उत्पादनात वाढ मिळते. हिरवा चारा पचण्यास सोपा असल्याने तसेच रुचकर असल्याने जनावरे आवडीने खातात. हिरवा चारा साठविता येण्याजोगा असल्याने दुष्काळी काळात याचा वापर करता येऊ शकतो. 

मारवेल 
मारवेल उंच झुपक्‍यात वाढणारे बारीक खोडाचे, बहुवार्षिक गवत असून ते कमी पावसाच्या प्रदेशातही येते. 
हे गवत साठवणुकीसाठी योग्य अाहे. कारण या गवताची काडी बारीक, भरीव, रसदार, सतेज, लुसलुशीत व पौष्टिक असते. 
तंतुमय मुळाचे प्रमाण जास्त असल्यामुळे उताराच्या जमिनीची धूप थांबवण्यासाठी व शेतीचे बांध मजबूत करण्यासाठी या गवताचा उपयोग होतो. 
मध्यम ते हलक्‍या प्रकारच्या जमिनीमध्येसुद्धा हे गवत चांगल्या प्रकारे येते. 
जास्त पावसाच्या उताराच्या जमिनीवर तसेच कमी पावसाच्या प्रदेशात या चारा गवताची लागवड करणे उपयुक्त ठरते. 
पावसाळ्यात पाच अाठवड्यांच्या रोपांची लागवड करावी. 
लागवडीच्या वेळी २० किलो नत्र, २० किलो पोटॅश प्रतिहेक्‍टरी द्यावा. 
बागायत क्षेत्रातील मारवेल गवतापासून दरवर्षी पाच ते सहा कापण्या मिळतात. जिरायती क्षेत्रात हेक्‍टरी २०० ते ३०० क्विंटल व बागायती क्षेत्रात २५० ते ३५० क्विंटल हिरवा चारा मिळतो. 
पोषणमूल्ये ः क्रूड प्रथिने ७.१ टक्के, स्निग्ध पदार्थ १.४ टक्के, खनिजे १०.६  टक्के व पिष्टमय पदार्थ ४१.०१ टक्के असतात. 

दशरथ गवत 
दशरथ गवत हे मूळ उष्णकटीबंधीय प्रदेशातील असून विविध चारा पिकांपैकी महत्त्वाचे चारा पीक आहे. 
उष्ण हवामानात व मध्यम स्वरूपाच्या जमिनीत याची वाढ चांगली होते. 
दलदलीच्या अगर हलक्‍या स्वरूपाच्या जमिनीत याची वाढ होत नाही. 
या बहुवर्षीय झुडपाचा सकस पाला जनावरे आवडीने खातात. 
पोषणमूल्ये ः यामध्ये १८ टक्के क्रूड प्रथिने असतात. 

स्टायलो 
पाऊसमान कमी असलेल्या, हलक्‍या ते मुरमाड डोंगर उताराच्या जमिनीत स्टायलो गवताची लागवड करता येते. 
स्टायलो गवत शेळ्या - मेंढ्या अत्यंत आवडीने खातात. 
या गवतात १४ टक्के क्रूड प्रथिने असतात. 
लागवड जून ते ऑगस्टच्या दरम्यान करावी. लागवडीसाठी फुले क्रांती ही जात निवडावी. 
बियाणे अतिशय हलके असते, हेक्‍टरी १२-१५ किलो बियाणे लागते. 
पेरणीनंतर बियाणे मातीने झाकू नये. जास्त बियाणे झाकल्यास उगवणशक्तीवर परिणाम होतो. 
वर्षातून दोनदा कापणी करावी. हिरव्या चाऱ्याचे प्रति हेक्‍टर २५० क्विंटल उत्पादन मिळते. 
लागवडीसाठी फुले क्रांती या वाणाची निवड करावी. 

अंजन गवत 
बागायती व कोरडवाहू पीक म्हणून या गवताची लागवड करता येते. 
कोरडवाहू पिकापासून २-३ आणि बागायती पिकापासून ६-८ कापण्या मिळतात. वर्षात साधारणपणे १५,००० ते २६,००० किलो हिरवा चारा मिळतो. 
६० सें.मी. अंतरावर सऱ्या काढून सऱ्यामधील वरंब्यावर ३० सें.मी. अंतरावर रोपे लावतात. 
जाती ः मारवार अंजन, बंडल अंजन-१, को-१ (निल कोलुकट्टाई), बंडल अंजन-३.

Web Title: agrowon news milk