कडधान्य आणि तेलबियांच्या ‘एमएसपी’मध्ये वाढ शक्य

वृत्तसंस्था
सोमवार, 19 जून 2017

नवी दिल्ली - देशभरात शेतीमालाचे रास्त दर आणि शेतकरी प्रश्नांवरून विविध आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे भाजपची प्रतिमा बिघडण्याची शक्यता गृहीत धरून केंद्र सरकारमार्फत विविध योजना, कार्यक्रम राबविण्याचा प्रयत्न होत आहे. याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांनी खरिपातील कडधान्य आणि तेलबियांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (एमएसपी) वाढ करणार असल्याचे नुकतेच प्रतिपादन केले आहे.

याचा एक भाग म्हणून अल्प मुदत पीककर्जास नुकतीच मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच कीटकनाशक आणि बियाणे कंपन्यांनाही त्यांच्या उत्पादनांचे दर वाढवू नका असे सांगण्यात आल्याचे समजते. दरवर्षी खरिपाच्या सुरवातीस केंद्र सरकारतर्फे एमएसपी जाहीर केली जाते. यंदा अद्यापही ती जाहीर करण्यात आलेली नाही. याविषयी कृषिमंत्र्यांनी सांगितले की कृषिमूल्य आयोगाकडून एमएसपीसंदर्भात शिफारशी प्राप्त झाल्या आहेत. त्या कॅबिनेटपुढे ठेवल्या जातील व त्यांच्या मंजुरीनंतर या शिफारशी जाहीर केल्या जातील. तेलबिया आणि कडधान्यांमध्ये सुमारे ४०० रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

चीन दौरा रद्द
ब्रिक्स देशांच्या कृषिमंत्र्यांची चीन येथे तीनदिवसीय बैठक होती. मात्र, देशातील शेतकरी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषिमंत्री सिंह यांचा चीन दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Web Title: agrowon news msp increase in graines & oil seed