कांदाचाळीसाठी ४८ हजार ऑनलाइन अर्ज

कांदाचाळीसाठी ४८ हजार ऑनलाइन अर्ज

नगर - कांदा साठवणीसाठी राज्यातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये साधारण पाच हजार सहाशे कांदाचाळी बांधण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्यासाठी ४९ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून आतापर्यंत सुमारे ४८ हजार ३४६ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे ऑनलाइन नोंदणी केलेली आहे. 

उपलब्ध निधीचा विचार करता तब्बल दहा पट अधिक अर्ज दाखल झाले असून एकट्या नगर जिल्ह्यामध्ये तब्बल ३३ हजार ९६२ शेतकऱ्यांनी कांदाचाळीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. मात्र जिल्ह्यासाठी मिळालेल्या निधीचा विचार करता फक्त ९०० शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो हे स्पष्ट झाले आहे.

एकाचवेळी कांदा बाजारात आल्यावर दर पडतात, त्याचा शेतकऱ्यां स्थितीवर परिणाम होतो. त्यामुळे कांदा साठवणीसाठी कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून कांदाचाळ उभारल्या जात आहे. त्यासाठी सतरा हजार पाचशे रुपये पाच टनांच्या कांदाचाळीला अनुदान देणार आहे. 

कमीत कमी पाच टन तर जास्तीत जास्त पंचवीस टनापर्यंत अनुदानावर कांदा चाळ उभी करता येते. यावर्षी राज्यातील तेहतीस जिल्ह्यांमध्ये एक लाख ४१ हजार ४३० मेट्रिक टन साठवण क्षमतेच्या कांदा चाळी उभ्या करण्याचे शासनाचे नियोजन आहे. 

योजनेचा लाभ घेण्यासाठी आता ऑनलाइन अर्ज मागवले जात आहेत. त्यानुसार आतापर्यंत ४८ हजार ३४६ शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. मात्र जास्तीत जास्त निधी देयकानुसार पंचवीस टनाच्या कांदाचाळी उभ्या केल्या तरी राज्यात साधारण पाच हजार सहाशे कांदाचाळी होऊ शकतात. ऑनलाइन अर्जाचा विचार करता उपलब्ध निधीनुसार दहा पट शेतकऱ्यांनी कांदाचाळीची आतापर्यंत मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शासनाने पारदर्शक कारभारासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइनच अर्ज करण्याचे अवाहन केलेले आहे. तरीही काही ठिकाणी ऑफलाइन अर्ज केले असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्याचा आकडा निश्‍चित नाही.

जिल्हानिहाय ऑनलाइन अर्ज स्थिती
अकोला १२१, अमरावती १०, बुलडाणा २१२५, वाशीम ४७, यवतमाळ ५४, औरंगाबाद १२७, बीड ३३४, हिंगोली २५६, जालना १३३५, लातूर १११८, नांदेड ४३५, उस्मानाबाद ३७५, परभणी ५७४, रायगड ५, रत्नागिरी १०२, सिंधुदुर्ग ३६, ठाणे २४, भंडारा १४, चंद्रपूर  ७, गडचिरोली ७, नागपूर ७९, वर्धा १८७, नगर ३३,९६२, धुळे ५९, जळगाव ७१, नंदुरबार  ८२, नाशिक ६,२७१, कोल्हापूर ७०, पुणे १४२, सांगली ४१, सातारा १०९, सोलापूर १४४, मुंबई २, पालघर ४.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com