हतबल शेतकऱ्यांची डाळिंब बागांवर कुऱ्हाड; दोन वर्षांपासून उत्पादनात तोटा

प्रतिनिधी
Wednesday, 21 October 2020

जिल्ह्यात सर्वाधिक साधारण २५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. राहाता,पारनेर तालुक्यात क्षेत्र अधिक आहे. श्रीगोंदा, कर्जतमध्ये लिंबू तर नगर तालुक्यात संत्र्याचे क्षेत्र अधिक आहे.

नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि पावसामुळे काळे डाग पडली. डाळिंब बागांवरचे संकट टळायला तयार नाही. दोन वर्षापासून डाळिंबात तोटा होत असल्याने यंदा उत्पादन खर्चही निघाला नाही. यामुळे हतबल झालेले शेतकरी आता डाळिंब बागांवर कुऱ्हाड चालवू लागले आहेत. जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहाता, राहूरीसह अन्य ठिकाणी अनेक शेतकऱी डाळिंबाच्या बागांवर कुऱ्हाड चालवत आहेत. आतापर्यत अनेक शेतकऱ्यांनी काढून टाकल्या आहेत. 

जिल्ह्यात सर्वाधिक साधारण २५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. राहाता, राहुरी, श्रीरामपूर, संगमनेर, पाथर्डी, पारनेर तालुक्यात क्षेत्र अधिक आहे. श्रीगोंदा, कर्जतमध्ये लिंबू तर नगर तालुक्यात संत्र्याचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे नगर, राहाता, संगमनेर बाजारात डाळिंब, संत्र्यातून तर कर्जत, श्रीगोंद्यात लिंबातून मोठी उलाढाल होते. मागील पाच वर्षात तीन वेळा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अशा परिस्थितीतही फळबागा जोपासल्या. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

फळपिके घेणाऱ्या शेतकऱ्यांनी शेततळी केली. त्याचाही दुष्काळात बागा जोपासायला फायदा झाला. दोन वर्षापासून मात्र डाळिंब बागा सतत संकटात आहेत. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही डाळिंबाच्या पिकांचे सततच्या पावसाने नुकसान झाले. रोगांमुळे दर पडल्याने यंदा डाळिंब उत्पादकांना सहाशे कोटींचा फटका सोसावा लागला आहे. शेतकऱ्यांनी आता फळबागांवर कुऱ्हाड चालवायला सुरवात केली आहे. राहुरी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर भागात अनेक शेतकऱ्यांनी फळबागा काढून टाकल्या आहेत. विशेष म्हणजे झालेल्या नुकसानीची कृषी विभागाने फारसी दखल घेतली नसल्याची शेतकऱ्यांना खंत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘सव्वा दोन एकरावची डाळिंबाची बाग होती. दोन-तीन वर्ष झाली, सतत पीक संकटात आहे. खर्चा इतकेही उत्पन्न मिळाले नाही. कष्ट वाया गेले. नाईलाजाने पुजा करुन बागेवर कुऱ्हाड चालवली. अनेक शेतकऱ्यांनी बागा काढून टाकल्या आहेत. काही दिवसांनी बागा पहायला भेटणार नाहीत. 
- सोपानराव तांबे, शेतकरी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agrowon news Pomegranate orchard loss in production for two years