सांगलीत बेदाणाची आवक वाढली

अभिजित डाके
मंगळवार, 16 जानेवारी 2018

सांगली - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याची गत सप्ताहात ५२७५ क्विंटल आवक झाली असून त्यास प्रति क्विंटलला १० हजार ते १८ हजार १०० रुपये असा दर मिळाला. बाजार समितीत बेदाण्याची आवक वाढल्याने बेदाण्याचे दर किंचित कमी झाले आहेत. गुळाचे दर मात्र स्थिर आहेत. जिल्ह्यात हळद काढणी सुरू झाली आहे. त्यामुळे नवीन हळदीच्या आवकेकडे लक्ष लागले आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक आहे. गुळाची २१० क्विंटल आवक झाली. गुळास ३००० ते ४१२४ व सरासरी ३५६२ रुपये क्विंटल असे दर होते. गुळाची नवीन आवक पुढील पंधरा दिवसांपर्यंत सुरू होण्याची शक्‍यता आहे. पुढील दोन-तीन महिने गूळ दरात वाढ होणार नसल्याचा अंदाज व्यापारी वर्गाने व्यक्त केला. बाजार समितीत जुनी हळद सौद्यासाठी येऊ लागली आहे. राजापूरी हळदीची ५१ क्विंटल आवक झाली. हळदीला ६२५० ते ९३८८ व सरासरी ८७१९ रुपये प्रतिक्विंटल असा दर होता. जिल्ह्यात नवीन हळद काढणी सुरू आहे. त्यामुळे नवीन हळदी बाजार समितीत नवीन हळदीच्या आवकेची व्यापारी प्रतीक्षा करू लागले आहेत. ज्वारीची (हायब्रीड) २० क्विंटल आवक झाली. ज्वारीस ३०६६ ते ३१९४ व सरासरी ३१२८ रुपये प्रति क्विंटल असे दर होते.

Web Title: agrowon news sangli raisin