सोलापुरात गवार, भेंडी, काकडीला उठाव

सुदर्शन सुतार
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, काकडीची आवक तुलनेने कमीच राहिली; पण मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरात संपूर्ण सप्ताहात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर - सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवार, भेंडी, काकडीची आवक तुलनेने कमीच राहिली; पण मागणी चांगली असल्याने त्यांच्या दरात संपूर्ण सप्ताहात तेजी राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गवारीची १० ते १५ क्विंटल, भेंडीची १० ते २० क्विंटल आणि काकडीची १५ ते २० क्विंटलपर्यंत आवक राहिली, ही सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहे; पण किंचित चढ-उतार वगळता दर मात्र टिकून आहेत. गवारीला प्रतिदहा किलोसाठी २७० ते ५०० व सरासरी ३०० रुपये, भेंडीला ६० ते ३५० व सरासरी २०० रुपये, तर काकडीला ८० ते २५० व सरासरी १८० रुपये असा दर होता. त्याशिवाय वांगी, टोमॅटो यांचे दरही काहीसे स्थिर राहिले. त्यांची आवक मात्र जास्त होती.

वांग्याची रोज ३० ते ४० क्विंटल आणि टोमॅटोची रोज किमान ३०० क्विंटलपर्यंत आवक झाली. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ८० ते ३०० व सरासरी २२० रुपये, तर टोमॅटोला ५० ते ३५० व सरासरी २०० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्यामध्ये कोथिंबीर, मेथीचे दर वधारले. त्यातही कोथिंबिरीला चांगला उठाव होता. भाज्यांची आवक तशी जेमतेमच रोज ५ ते ८ हजार पेंढ्यांपर्यंत होती. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी १००० ते १९०० रुपये आणि मेथीला ६०० ते १४०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर वधारले
कांद्याच्या दरात या सप्ताहात चांगलीच सुधारणा झाली. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर हलत नव्हते; पण या सप्ताहात आवकही काहीशी वाढली; पण मागणी चांगली असल्याने दरही वाढले. कांद्याची आवक रोज ६० ते ८० गाड्यांपर्यंत होती. कांद्याची सगळी आवक स्थानिक भागातूनच झाली. कांद्याला प्रतिक्विंटल ३०० ते ३८०० व सरासरी १५०० रुपये असा दर राहिला.

Web Title: agrowon news solapur cucumber Lady's finger