मलकापूरला सोयाबीन २४०० ते २७५० रुपये

प्रतिनिधी
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

अकोला - बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची १६६ क्विंटल अावक झाली होती. त्यास २४०० ते २७५० आणि सरासरी २६५० रुपये प्रतिक्विंटल दर होते, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

येथे तुरीची ४३२ क्विंटल अावक झाली. तुरीला ३३०० ते ४००० रुपये तर सरासरी ३९५५ रुपये प्रतिक्विंटल दर होता. गव्हाची ६५ क्विंटल आवक होऊन १४५० ते १७११ व सरासरी १६५० रुपये प्रतिक्विंटल दर होता. ज्वारीची अावक २४ क्विंटल होती. ज्वारीला १३२० ते १४४५ रुपये प्रतिक्विंटल दर होता. हरभऱ्याची २५ क्विंटल आवक झाली. हरभऱ्यास ३३०० ते ४९३५ रुपये प्रतिक्विंटल दर होता. हरभऱ्यास सरासरी  ४२०० रुपये दर होता.  मुगाला क्विंटलमागे ३७०० ते ४०७५ रुपये होता. तर उडिदाला ३००० ते ४४५० रुपये व सरासरी ३८७५ रुपये प्रतिक्विंटल दर होता. 

Web Title: agrowon news soyabean akola