साताऱ्यात टोमॅटो सरासरी ३००० रुपये क्विंटल

विकास जाधव 
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

सातारा - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गतसप्ताहात टोमॅटोचे दर तेजीत राहिले आहेत. टोमॅटोची २४७ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला १००० ते ५००० रुपये, तर सरासरी ३००० रुपये क्विंटल असा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

बाजार समितीत टोमॅटो वगळता इतर सर्व भाजीपाल्याचे दर स्थिर राहिले. कोरेगाव, फलटण, सातारा, खटाव तालुक्‍यातून बहुतांशी भाजीपाल्याची आवक होत आहे. 

वांग्याची १३३ क्विंटल आवक झाली. वांग्यास १२०० ते ३००० रुपये तर सरासरी २१०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. हिरव्या मिरचीची १८५ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीस ३००० ते ४००० रुपये तर सरासरी ३५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. कोबीची १३३ क्विंटल आवक झाली. कोबीला ६०० ते १००० रुपये तर सरासरी ८०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची ५६ क्विंटल आवक झाली. फ्लॉवरला १००० ते ३००० रुपये तर सरासरी २००० रुपये क्विंटल असा दर मिळाला आहे. भाजीपाल्यात मेथीची प्रतिदिन १००० ते १५०० जुड्या आवक झाली. मेथीस शेकड्यास ४०० ते ५०० रुपये, तर सरासरी ४५० रुपये असा दर मिळाला. कोथिंबिरीची १५०० ते २००० जुड्या आवक झाली. कोथिंबिरीला शेकड्यास ३०० ते ५०० रुपये तर सरासरी ४०० रुपये असा दर मिळाला. 

Web Title: agrowon news tomato satara