‘पणन’कडून आता मोबाईल  व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल

रविवार, 14 जानेवारी 2018

पुणे - शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट किंवा वैयक्तिक शेतकऱ्यांच्या शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ मिळण्यासाठी पणन मंडळाच्या वतीने माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. या मॉडेलसाठी महानगरपालिकांना जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पणन मंडळाच्या वतीने राज्य शासनाकडे केली आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्याच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली साेमवारी (ता. १५) बैठकीचे आयाेजन करण्यात आले आहे.

शहरांमध्ये ग्राहक आणि शेतकऱ्यांना रास्त दरात शेतमालाची खरेदी विक्री करता यावी, आणि या माध्यमातून शेतमालाला शाश्‍वत बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी पणन मंडळ प्रयत्नशील आहे. यासाठी शहरांच्या विविध भागांत माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे मॉडेल विकसित करण्यात येत आहे. यामध्ये कंटेनरप्रमाणे वातानुकूलित माेबाईल व्हॅन विकसित करण्यात येणार असून, यामध्ये विविध सुविधा देण्यात येणार आहेत. १० ते १२ शेतकरी एका व्हॅनद्वारे आपला शेतमाल विक्री करू शकणार आहे. यासाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या माेबाईल व्हेजीटेबल मार्केटचे व्यवस्थापन पणन मंडळाच्या वतीने करण्यात येणार असून, दरराेज शहराती विविध आणि विशिष्ट ठिकाणी ही वाहने उभी करण्यात येणार आहे. या वाहनांमधील जागा शेतकऱ्यांना विनामूल्य वापरासाठी देण्यात येणार असून, दरराेज पहिल्या येणाऱ्या शेतकऱ्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, अशी माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.

दरम्यान, या याेजनेसाठी धाेरणात्मक निर्णय घ्यावा, असे पत्र माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले हाेते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव, नगर विकास विभाग, कृषी विभागाचे प्रधान सचिव, एमएसीपीचे प्रकल्प संचालक, पणन संचालक, पणन मंडळाचे कार्यकारी संचालक, समन्वयीत कृषी विकास प्रकल्पाच्या संचालकांना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.